Asia Cup 2023 | अखेर आशिया कप स्पर्धेचं ठरलं, जाणून घ्या कुठे होणार आयोजन?

| Updated on: Feb 16, 2023 | 11:16 PM

आशिया कप स्पर्धेचं सप्टेंबरमध्ये पाकिस्तानमध्ये आयोजन करण्यात आलं आहे. मात्र बीसीसीआय सचिव जय शाह यांनी टीम इंडिया पाकिस्तानमध्ये खेळणार नसल्याचं स्पष्ट केलंय.

Asia Cup 2023 | अखेर आशिया कप स्पर्धेचं ठरलं, जाणून घ्या कुठे होणार आयोजन?
Follow us on

मुंबई : भारत आणि पाकिस्तान, 2 कट्ट्रर प्रतिस्पर्धी. या दोन्ही देशांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून ताणल्या गेलेल्या राजकीय संबंधांमुळे दोन्ही पारंपरिक संघांमध्ये द्विपक्षीय क्रिकेट मालिका झालेली नाही. दोन्ही संघ फक्त आयसीसीच्या स्पर्धेत आणि आशिया कपमध्ये खेळतात.आशिया कप स्पर्धेच्या आयोजनावरुन वादाला तोंड फुटलं होतं. टीम इंडियाने कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानमध्ये न खेळण्याची भूमिका घेतली आहे. आता या आयोजनाचा मुद्दा निकाली निघू शकतो.

आशिया कप नियोजनानुसार पाकिस्तानमध्येच होऊ शकतो. तर टीम इंडियाचे सामने यूएईमध्ये खेळवले जाऊ शकतात. पीटीआयने आपल्या रिपोर्टमध्ये पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.

तसंच टीम इंडिया जर आशिया कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहचली, तर अंतिम सामना ही यूएईमध्ये खेळवण्यात येईल. आशियाई क्रिकेट परिषदेची 4 फेब्रुवारीला बैठक पार पडली.या बैठकीत एसीसीने पाकिस्तानकडे आशिया कप स्पर्धेचं यजमानपद नसल्याचं म्हटलं होतं.

हे सुद्धा वाचा

नजम सेठी काय म्हणाले?

पीसीबीचे अध्यक्ष नजम सेठी यांनी माध्यमांशी संवाद साधला. या दरम्यान त्यांनी “आयसीसीसोबत होणाऱ्या बैठकीत आशिया कप आयोजनाबाबत चर्चा होईल. एसीसीच्या बैठकीत काय झालं, मी या वर काय बोलू, काहीच निकाल निघाला नाही”, असं सेठी यांनी म्हटलं.

विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानकडे आशिया कपचं यजमानपद राहिल. मात्र काही सामने हे यूएईत होतील. टीम इंडिया इथेच सर्व सामने खेळेल. तसेच टीम इंडिया फायनलमध्ये पोहचल्यास अंतिम सामनाही यूएईत होईल.

पाकिस्तानची धमकी

आशिया कप स्पर्धेचं आयोजन हे सप्टेंबर महिन्यात पाकिस्तानमध्ये करण्यात आलं आहे. मात्र बीसीसीआय सचिव आणि एसीसी प्रमुख जय शाह यांनी ऑक्टोबर 2022 मध्येच पाकिस्तानला जाणार नसल्याची भूमिका घेतली होती. यानंतर पाकिस्तानने आम्ही पण भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्ड कपमध्ये सहभागी होणार नाही, अशी धमकी दिली होती. पीसीबीचे माजी प्रमुख रमीज राजा यांनी ही धमकी दिली होती.

टीम्सची दोन ग्रुप्समध्ये विभागणी

आशिया कपच आयोजन सप्टेंबरमध्ये होणार आहे. एकूण 6 संघ या टुर्नामेंटमध्ये खेळताना दिसतील. यावेळी टुर्नामेंट वनडे फॉर्मेटमध्ये होईल. टीम्सची दोन ग्रुप्समध्ये विभागणी करण्यात आलीय. एसीसी बनवलेल्या फॉर्मेटनुसार, भारत-पाकिस्तानचा सामना निश्चित आहे.