कोलंबो | आशिया कप 2023 मधील तिसरा सामना हा सर्वात मोठा आणि हायव्होल्टेज असणार आहे. या सामनयात 2 कट्टर प्रतिस्पर्धी आमनेसामने असणार आहेत. टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात हा थरारक सामना होणार आहे. हा सामना 2 सप्टेंबर रोजी पार पडणार आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरुवात होणार आहे. हा सामना कँडी येथील पल्लेकल आंरराष्ट्रीय स्टेडियममध्ये होणार आहे. या सामन्यावर पावसाचं सावट आहे. सामन्यादरम्यान पाऊस होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे हा सामना रद्द झाल्यावर काय होईल, विजेता कोण ठरणार? याबाबत नियम काय आहे हे जाणून घेऊयात.
टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान सामन्याच्या दिवशी 2 सप्टेंबरला श्रीलंकेतील कँडी इथे पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान खात्यानुसार, कँडीमध्ये 2 सप्टेंबरला पाऊस होणार असल्याची 70 टक्के शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे सामना होण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे सामना रद्द होऊ शकतो. सामना रद्द झाल्यास टीम इंडिया आणि पाकिस्तान या दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 पॉइंट दिला जाईल. कारण या सामन्यासाठी राखीव दिवस नाही.
आशिया कपमध्ये विजेत्या संघाला 2 पॉइंट्स दिले जातात. आता सामना रद्द झाल्यावर 1-1 पॉइंट मिळेल. याचा फायदा पाकिस्तानला होईल. कारण पाकिस्तानने नेपाळ विरुद्ध पहिलाच सामना हा मोठ्या फरकाने जिंकला आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या खात्यात 2 पॉइंट्स आहे. पाकिस्तानचा नेट रन रेट हा +4.760 असा आहे. त्यामुळे 1 पॉइंट मिळाल्यानंतर पाकिस्तान सुपर 4 साठी क्वालिफाय करेल.
दरम्यान टीम इंडियाने आतापर्यंत पल्लेकेले स्टेडियममधील एकूण 3 एकदिवसीय सामने खेळले आहेत. टीम इंडियाने या तिन्ही सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे टीम इंडियाची आकडेवारी या मैदानात दमदार आहे.
आशिया कप 2023 साठी अशी आहे टीम इंडिया | रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, ईशान किशन, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि संजू सॅमसन (राखीव विकेटकीपर).
आशिया कपसाठी पाकिस्तान क्रिकेट टीम | बाबर आझम (कॅप्टन), शादाब खान (उपकर्णधार), अब्दुल्ला शफीक, फखर जमान, इमाम-उल-हक, सलमान अली आगा, इफ्तिखार अहमद, तय्यब ताहिर, सौद शकील (फक्त अफगाणिस्तान मालिकेसाठी), मोहम्मद रिझवान, मोहम्मद हारिस, मोहम्मद नवाज, उसामा मीर, फहीम अश्रफ, हरिस रौफ, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह आणि शाहीन आफ्रिदी.