पल्लेकेले | टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याने आशिया कप 2023 मध्ये नेपाळ विरुद्धच्या सामन्यात खणखणीत अर्धशतक ठोकलंय. रोहितने विजयी धावांचा पाठलाग करताना हे झंझावाती अर्धशतक पूर्ण केलंय. रोहितच्या वनडे करिअरमधील हे 49 वं अर्धशतक ठरलंय. रोहितने चौकार ठोकून रुबाबात अर्धशतक पूर्ण केलं. रोहितने फक्त 39 बॉलमध्ये फिफ्टी पूर्ण केली. रोहितने या दरम्यान 3 कडक सिक्स आणि 5 दणदणीत चौकार ठोकले.
रोहित शर्मा याने नेपाळ विरुद्धच्या या अर्धशतकासह मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. रोहित आशिया कप इतिहासात अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय फलंदाज ठरला आहे. रोहितचं नेपाळ विरुद्धचं अर्धशतक हे आशिया कपमधील दहावं अर्धशतक ठरलं. रोहित यासह आशिया कपमध्ये 10 आणि त्यापेक्षा अर्धशतक झळकावणारा पहिला भारतीय ठरलाय.
रोहित शर्माचं दमदार अर्धशतक
FIFTY for Captain @ImRo45 off 39 deliveries 👏
His 49th in ODIs
Live – https://t.co/FMAPg9dqRh… #INDvNEP pic.twitter.com/TvSKaguoYp
— BCCI (@BCCI) September 4, 2023
रोहितने या अर्धशतकी दरम्यान आणखी एक कीर्तीमान केला. रोहितने या अर्धशतकादरम्यान 3 सिक्स ठोकले. रोहित यासह एकदिवसीय क्रिकेट इतिहासात ओपनर म्हणून 250 सिक्सचा टप्पा पार करणारा तिसरा फलंदाज ठरला. रोहितने या अर्धशतकी खेळीसह अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केले. वर्ल्ड कपआधी रोहित शर्माला या अर्धशतकी खेळीमुळे नक्कीच विश्वास मिळाला असेल.
रोहित शर्मा तिसरा ओपनर बॅट्समन
Rohit Sharma completed his 250th six with an outrageous shot.
One of the best six hitters in history! pic.twitter.com/uWLgZRtGhB
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 4, 2023
टीम इंडिया प्लेईंग इलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.
नेपाळ क्रिकेट टीम प्लेइंग इलेव्हन | रोहित पौडेल (कॅप्टन), कुशल भुर्तेल, आसिफ शेख (विकेटकीपर), भीम शार्की, सोमपाल कामी, गुलशन झा, दीपेंद्र सिंग आयरी, कुशल मल्ला, संदीप लामिछाने, करण केसी आणि ललित राजबंशी.