मुंबई : आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान सामना सुरू असून सामन्याधी टीमला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा स्टार खेळाडू श्रेयस अय्यरबाबत वाईट बातमी समोर आली आहे. टॉसच्यावेळी रोहित शर्माने संघात कोणते बदल केले आहेत याबाबत सांगितलं. तेव्हा त्याने दोन बदल झाल्याचं सांगितलं, यामध्ये जसप्रीत बुमराह संघात आला आहे तर श्रेयस अय्यर याच्या जागी के. एल. राहुल याला संधी मिळाली आहे. सर्वांना वाटलं राहुल याला प्लेइंग 11 मधून ड्रॉप करून राहुल याला संघात स्थान दिलं गेलं असावं. मात्र रोहितने अय्यर बाहेर जाण्याचं कारण सांगितलं त्यानंतर सर्वांनाच धक्का बसला.
श्रेयस अय्यर याला परत एकदा पाठीची समस्या उद्धवली आहे. त्यामुळे अय्यर याला बाहेर बसवण्यात आलंय. श्रेयस अय्यरने आताच पाठीच्या दुखापतीतून सावरत कमबॅक केलं आहे. नेपाळ आणि पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात श्रेयस मैदानात उतरला होता. सरावादरम्यान त्याला काही दुखापत झाल्याची माहिती समजत आहे. मात्र आता ही दुखापत किती गंभीर आहे याबाबत कोणतीच माहिती समोर आली नाही.
श्रेयस अय्यर या दुखापतीमुळे आशिया कपमधून बाहेर पडण्याची शक्यता वर्तवली आहे. वर्ल्ड कप तोंडवर आला असताना अशा दुखापती टीम इंडियासाठी अडचणी वाढवणाऱ्या आहेत. त्याच्या जागी संघात के.एल. राहुल याला जागा मिळाली. आयपीएलच्या 16व्या मोसमात मांडीचा त्रास झाल्याने बाहेर पडलेला राहुलम पहिल्यांदा मैदानात उतरला आहे.
दरम्यान. के. एल. राहुल याने वन डे फॉरमॅटमध्ये चौथ्या क्रमांकावर खेळताना 7 डावांमध्ये 40.17 च्या सरासरीने 241 धावा केल्यात. त्यामुळे या सामन्यात के. एल. राहुल याच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.
पाकिस्तान (प्लेइंग इलेव्हन): फखर जमान, इमाम-उल-हक, बाबर आझम (C), मोहम्मद रिझवान (W), आगा सलमान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हॅरिस रॉफ
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (C), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, इशान किशन (W), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज