मुंबई : आशिया कप 2023 स्पर्धेतील भारत विरुद्ध पाकिस्तान हा हायव्होल्टेज सामना सुरु होण्यासाठी अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक आहे. बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर हे दोन संघ आमनेसामने येणार आहेत. त्यामुळे या सामन्यात कोण बाजी मारणार? या वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत. दोन्ही संघांची क्षमता जबरदस्त असून हा सामना अतितटीचा होईल असंच क्रिकेट तज्ज्ञांचं म्हणणं आहे. पाकिस्ताननं आशिया कप स्पर्धेपूर्वी जबरदस्त कामगिरी केली आहे. श्रीलंकेविरुद्धची कसोटी असो की, अफगाणिस्तानला वनडे मालिकेत दिलेला व्हाईटवॉश असो. इतकंच काय तर आशिया कप स्पर्धेतील पहिल्या सामन्यात नेपाळला 238 धावांनी पराभूत केलं आहे. त्यामुळे पाकिस्तानचा आत्मविश्वास दुणावलेला आहे. दुसरीकडे, टीम इंडियाने आशिया आणि वर्ल्डकपच्या दृष्टीकोनातून मोर्चेबांधणी केली आहे. दुखापतीतून सावरत दिग्गज खेळाडूंनी कमबॅक केलं आहे. त्यामुळे टीम इंडियाची बाजूही भक्कम झाली आहे. त्यामुळे या सामन्यात कोणते खेळाडू चमकदार कामगिरी करतील, याबाबतचा अंदाज जाणून घेऊयात
भारत विरुद्ध पाकिस्तान सामना श्रीलंकेच्या पल्लेकेले आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये होणार आहे. मैदान फलंदाज आणि गोलंदाजांसाठी पूरक आहे. मधल्या षटकांमध्ये फिरकीपटू कमाल करू शकतात. तसेच प्रथम फलंदाजी करणारा संघ अंदाजे 240 पर्यंत मजल मारू शकतो. त्यामुळे हा स्कोअर गाठणं सोपं होईल. त्यामुळे नाणेफेकीचा कौल जिंकला तर कर्णधार गोलंदाजी करणं पसंत करेल. दोन्ही संघ आतापर्यंत 132 सामने खेळले आहेत. यात पाकिस्तानने 73 आणि भारताने 55 सामन्यात विजय मिळवला आहे.
भारतीय संघात असलेला विकेटकीपर बॅट्समन केएल राहुल दुखापतीमुळे पहिल्या दोन सामन्यांना मुकणार आहे. म्हणजेच पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात नसेल.
भारताची संभावित प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह
पाकिस्तानची संभावित प्लेइंग इलेव्हन : बाबर आझम (कर्णधार), फखर झमान, इमाम उल हक, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), इफ्तिखार अहमद, आघा सलमान, शादाब खान, मोहम्मद नवाज, नसीम शाह, शाहीन आफ्रिदी, हारिस रौफ
टीम 1- मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), विराट कोहली, बाबर आझम, रोहित शर्मा, फखर झमान, शादाब खान, रवींद्र जडेजा (कर्णधार), हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, शाहीन आफ्रिदी (उपकर्णधार), हारिस रौफ.
टीम2- मोहम्मद रिझवा (विकेटकीपर), विराट कोहली (कर्णधार), बाबर आझम, रोहित शर्मा, शादाब खान, रवींद्र जडेजा, हार्दिक पांड्या (उपकर्णधार), जसप्रीत बुमराह, शाहीन आफ्रिदी, हारिस रौफ, मोहम्मद शमी.