मुंबई : आशिया कप 2023 स्पर्धेतील भारत विरुद्ध पाकिस्तान हा हायव्होल्टेज सामना सुरु आहे. या सामन्यात कोण बाजी मारणार? याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. सुपर फोर फेरीतील ही लढत खूपच महत्त्वाची आहे. कारण अंतिम फेरीचं तिकीट निश्चित होणार आहे. नाणेफेकीचा कौल पाकिस्तानच्या बाजूने लागला आणि बाबर आझमने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानी गोलंदाज भारतावर हावी होतील, असा विश्वास असल्याने त्याने हा निर्णय घेतला. दुसरीकडे, रोहित शर्मा यानेही नाणेफेकीचा कौल जिंकलो असतो तर फलंदाजीच घेणार असल्याचं सांगितलं. पाकिस्तानच्या गोलंदाजीला कितीही धार असली तर क्षेत्ररक्षणात मात्र फिके पडत अससल्याचं दिसून आलं आहे. कारण दुसऱ्या षटकात पाकिस्तानच्या शाहीन आफ्रिदीने झेल सोडला आणि शुबमन गिल याला जीवदान मिळालं.
नसीम शाह याला संघाचं दुसरं षटक सोपवलं. त्याने अपेक्षेप्रमाणे अचूक टप्प्याची गोलंदाजी केली आणि शुबमन गिलला पहिल्याच चेंडूवर जाळ्यात ओढलं. शुबमन गिल याला शॉर्ट आणि थोडा लांब चेंडू टाकला. हा चेंडू थेट बॅटच्या एजला लागून थर्ड मॅनकडे गेला. हा झेल आरामात टिपू शकला असता. पण शाहीन आफ्रिदी चेंडूवर उशिरा पोहोचला तसेच हातातला झेल सोडला. हा झेल पकडला असता तर शुबमन गिल शून्यावर बाद झाला असता.
Gill catch dropped
Follow us for more#INDvsPAK #ViratKohli𓃵 #HarisRauf#RohitSharmaKhulke #AsiaCup #PAKvIND Rain Shreyas Iyer KL Rahul #G20Bharat2023 Rohit Sharma pic.twitter.com/VtQS4lKzTY
— Neha Singhal (@livetradewithme) September 10, 2023
शाहीन आफ्रिदीने शुबमन गिल याचा झेल सोडल्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा वर्षाव सुरु झाला आहे. मजेशीर मीम्स पाहून तुम्हालाही हसू आवरल्याशिवाय राहाणार नाही. शाहीन आफ्रिदीने टाकलेल्या संघाच्या पाचव्या षटकावर शुबमन गिलने आक्रमक पवित्रा दाखवला. तीन चौकार ठोकत किती महत्त्वाचा झेल सोडून दिला ते दाखवून दिलं. पुन्हा एकदा बाद करण्याची संधी आली होती. पण तीही गमावली.
Shubman Gill owns Shaheen Afridi😎 pic.twitter.com/jGofbxUT8j
— Arun Singh (@ArunTuThikHoGya) September 10, 2023
Gill Smashing Shaheen afridi 😂🔥
#INDvsPAK pic.twitter.com/PdU937BpT6
— V I P E R™ (@VIPERoffl) September 10, 2023
we have seen this before 😭😭😭#INDvsPAK pic.twitter.com/wKOwMRbN1S
— Yashvi. (@BreatheKohli) September 10, 2023
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
पाकिस्तान (प्लेइंग इलेव्हन): बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), फखर जमान, इमाम उल हक, सलमान अली आगा, इफ्तिखार अहमद, मोहम्मद रिजवान (विकेटकीपर), फहीम अशरफ, नसीम शाह, शाहीन शाह अफ्रीदी आणि हारिस रऊफ.