मुंबई | आशिया कप 2023 स्पर्धेला आता मोजून 24 तासांपेक्षा कमी वेळ राहिला आहे. आशिया कपला 30 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. पहिल्या सामन्यात पाकिस्तान विरुद्ध नेपाळ आमनेसामने असणार आहे. त्याआधी टीम इंडियाच्या गोटातून अतिशय वाईट बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा स्टार खेळाडू हा पहिल्या 2 सामन्यातून बाहेर झाला आहे. टीम इंडियाचे हेड कोच राहुल द्रविड यांनी याबाबतची माहिती दिली आहे. बीसीसीआयने याबाबत ट्विट केलं आहे.
आशिया कप स्पर्धेतील साखळी फेरीत एकूण 6 संघ हे प्रत्येकी 2 सामने खेळणार आहे. हे 6 संघ एकूण 2 गटात विभागले आहेत. त्यानुसार टीम इंडिया, पाकिस्तान आणि नेपाळ हे 3 संघ ग्रुप ए मध्ये आहे. टीम इंडिया आशिया कपमधील आपला पहिलाच सामना हा पाकिस्तान विरुद्ध खेळणार आहे. तर दुसरा सामना हा नेपाळ विरुद्ध असणार आहे. या दोन्ही सामन्यातून टीम इंडियाचा विकेटकीपर बॅट्समन केएल राहुल हा बाहेर पडला आहे.
टीम इंडियाला मोठा झटका
UPDATE
KL Rahul is progressing really well but will not be available for India’s first two matches – against Pakistan and Nepal – of the #AsiaCup2023: Head Coach Rahul Dravid#TeamIndia
— BCCI (@BCCI) August 29, 2023
केएल राहुल याला आयपीएल 16 व्या मोसमात दुखापत झाली होती. केएलला दुखापतीमुळे आयपीएलचा 16 वा मोसमातून बाहेर पडावं लागलं होतं. केएलला या दुखापतीमुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमधून बाहेर व्हावं लागलं होतं. केएल गेली अनेक महिने आपल्या दुखापतीवर बंगळुरुतील एनसीएत मेहनत घेत होता. त्याच्यासोबत श्रेयस अय्यर हा देखील होता. आगामी आशिया कपआधी या दोघांनी कठोप परिश्रम घेत दुखापतीवर मेहनत घेतली. केएल आणि श्रेयस या दोघांनी दुखापतीवर मात केली.
त्यामुळे बीसीसीआय निवड समितीने आशिया कपमध्ये केएल राहुल याची निवड केली. मात्र आता एकाएकी केएल पाकिस्तान आणि नेपाळ विरुद्ध खेळणार नसल्याचं बीसीसीआयने जाहीर केलं आहे.
आशिया कपसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, केएल राहुल, ईशान किशन, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा.
राखीव खेळाडू | संजू सॅमसन (राखीव विकेटकीपर)