मुंबई | आशिया कप 2023 सुरु होण्यासाठी अवघ्या काही तासांचा कालावधी शिल्लक आहे. आशिया कपमधील पहिला सामना पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात पाकिस्तानमधील मुलतान या क्रिकेट मैदानावर खेळवला जाणार आहे. पण क्रिकेट वर्तुळातील अनेक चाहते भारत आणि पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्धींच्या सामन्याची आतुरतेने वाट पाहतं आहेत. या दोन्ही टीममधील महामुकाबला येत्या 2 सप्टेंबरला श्रीलंकेतील कॅन्डी या क्रिकेट मैदानात खेळला जाणार आहे.
या सामन्याची सर्वोत्र चर्चा रंगत आहेत.चर्चेत अनेकांनी पाकिस्तानवर टीम इंडिया भारी पडणार असल्याचा दावा केला आहे.तर अनेकांनी दोन्ही संघांमधील खेळाडूंची तुलना केली आहे.अशातचं दोन्ही संघाच्या फिरकी गोलंदाजांची तुलना केली असता कोणता संघ भारी पडला.
आशिया कप 2023 साठी टीम इंडियाने निवडलेल्या संघात कुलदीप यादव हा मुख्य फिरकी गोलंदाजांची भूमिका सांभाळणार आहे. तर त्याच्या जोडीला रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल हे गोलंदाजांचा सामावेश करण्यात आलेला आहे. कुलदीप यादव याने आतापर्यंतच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 124 सामन्यांमध्ये 227 विकेट्स घेतल्या आहेत. तर जडेजाने 361 सामन्यांमध्ये 520 विकेट्स घेतल्या आहेत. अक्षर पटेलने 109 सामन्यांत 147 विकेट्स मिळवल्या आहेत.
आशिया कप 2023 मध्ये पाकिस्तानकडे अनेक स्पिनर आहेत. यामध्ये शादाब खान, मोहम्मद नवाज, उसामा मीर, इफ्तिखार अहमद आणि सलमान अली आगा हे खेळाडू आहेत. शादाब याने वनडे सामन्यांमध्ये 77 विकेट्स आणि टी- 20 मध्ये त्याने 104 बळी घेतले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 87, उसामा मीरने 11, इफ्तिखार अहमदने 13 आणि सलमान अली आगाने 13 बळी घेतले आहेत.
दरम्यान, आशिया कपमध्ये पाकिस्तान आणि भारताचा सामना 2 सप्टेंबरला होणार आहे. या सामन्यामध्ये टीम इंडियाचा खेळाडू के. एल. राहुल खेळणार नाही. राहुल द्रविडने पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली.
आशिया कपसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, ईशान किशन, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि संजू सॅमसन (राखीव विकेटकीपर).
आशिया कपसाठी पाकिस्तान क्रिकेट टीम | बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), अब्दुल्ला शफीक, फखर जमान, इमाम-उल-हक, सलमान अली आगा, इफ्तिखार अहमद, तय्यब ताहिर, सौद शकील (फक्त अफगाणिस्तान मालिकेसाठी), मोहम्मद रिझवान, मोहम्मद हारिस, मोहम्मद नवाज, उसामा मीर, फहीम अश्रफ, हरिस रौफ, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह आणि शाहीन आफ्रिदी.