Virat Kohli : श्रीलंकेविरुद्ध विजय मिळवताच विराट कोहली याच्या नावावर विक्रमाची नोंद, काय केलं ते जाणून घ्या

| Updated on: Sep 13, 2023 | 8:53 PM

Asia Cup 2023 : श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीची बॅट चालली नाही. अवघ्या तीन धावा करून विराट कोहली तंबूत परतला. मात्र असं करूनही त्याच्या नावावर एक मोठा विक्रम नोंदवला गेला आहे.

1 / 7
आशिया कप स्पर्धेतील साखळी फेरीतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला. मात्र त्यानंतरचे तिन्ही सामने भारताने जिंकले. नेपाळ, पाकिस्तान आणि नंतर श्रीलंकेला पराभूत केलं. या तीन विजयानंतर विराट कोहलीच्या नावावर एका विक्रमाची नोंद झाली आहे.

2 / 7
टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्ध मिळवलेला विजय हा विराट कोहलीच्या क्रिकेट कारकिर्दीतील 300 वा विजय आहे. विराट कोहली याने टीम इंडियाकडून खेळताना 300 विजय पाहिले आहेत. अशी कामगिरी करत मोजक्या खेळाडूंमध्ये स्थान मिळवलं आहे.

3 / 7
विशेष म्हणजे मोजक्या खेळाडूंच्या यादी फक्त दोन भारतीय आहेत. यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि आता विराट कोहली याचा नंबर लागला आहे.

4 / 7
सचिन तेंडुलकर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 664 सामने खेळला असून यापैकी 307 सामन्यात विजय मिळवला आहे. आता हा विक्रम विराट कोहली मोडेल असंच चित्र आहे.

5 / 7
विराट कोहली याने आतापर्यंत 505 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. तर टीम इंडियाने 300 सामने जिंकले आहेत. त्यामुळे 300 सामन्यात विजय पाहणारा विराट कोहली हा जगातील सहावा खेळाडू आहे. टीम इंडियाने आणखी 8 सामन्यात विजय मिळवला की तो सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत काढेल.

6 / 7
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगच्या नावावर आहे. त्याने 560 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यापैकी 377 सामन्यात विजय मिळवला आहे.

7 / 7
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 300 हून अधिक सामन्यात विजयाचं तोंड पाहणाऱ्या खेळाडूंच्या सहा खेळाडू आहेत. रिकी पाँटिंग 377, महेला जयवर्धने 336, सचिन तेंडुलकर 307, जॅक कॅलिस 305, कुमार संगकारा 305, तर  विराट कोहली  याने 300 सामन्यात विजय पाहिला आहे.