Asia Cup 2023 India Squad : आशिया कपसाठी IPL मधील 4 स्टार मॅचविनर खेळाडूंची निवड, एक मुंबईकरांचा लाडका!

| Updated on: Aug 21, 2023 | 2:35 PM

India Asia Cup 2023 Squad Announcement : गेल्या अनेक चाहते दिवसांपासून आशिया कप साठी टीम इंडियाची घोषणा होण्याची वाट पाहत होते. अखेर बीसीसीआयने ही संघाची घोषणा केली असून त्यामध्ये आयपीएलमधील स्टार खेळाडूंचीही संघात निवड झाली आहे.

Asia Cup 2023 India Squad : आशिया कपसाठी IPL मधील 4 स्टार मॅचविनर खेळाडूंची निवड, एक मुंबईकरांचा लाडका!
Follow us on

मुंबई : आशिया कप 2023 साठी बीसीसीआयने (BCCI Announced Asia Cup Team India Squad 202) टीम इंडियाची घोषणा केली आहे. येत्या 30 ऑगस्टपासून आशिया कप सुरू होणार असून टीम इंडियाच्या संघामध्ये कोणाची निवड होते याची क्रीडा प्रेमींना उत्सुकता लागलेली होती.  कर्णधार रोहित शर्मा तर हार्दिक पंड्याकडे संघाचं उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. संघामध्ये दोन मुख्य फलंदाजांनी कमबॅक केलं असून तर त्यासोबतच आशिया कपसाठी चार युवा खेळाडूंनीही संघात आपली जागा मिळवली आहे.

 कोण आहेत ते’ युवा खेळाडू?

शुभमन गिल, तिलक वर्मा, इशान किशन आणि प्रसिद्ध कृष्णा या खेळाडूंनी जागा मिळवली आहे. शुबमन गिल वेस्ट इंडिज दौऱ्यावर अपयशी ठरल्याने त्याच्या स्थानाबाबत काही नक्की मानलं जात नव्हतं. मात्र त्यालाही संधी देण्यात आली आहे. तिलक वर्मा याने आपल्या दमदार प्रदर्शनाच्या जोरावर संघात स्थान मिळवलं, विंडिंजविरूद्ध तिलक वर्माने आपल्यातील कौशल्य दाखवून देत निवड समितीचं लक्ष वेधून घेतलं.

इशान किशन यालाही संघात घेण्यात आलं आहे. वन डे मालिकेमध्ये सलामीला तर कधी मिडल ऑर्डरला फलंदाजीला येत त्याने आक्रमक फलंदाजी करत संघातील स्थान कायम राखलं. प्रसिद्ध कृष्णा आता दुखापतीधून सावरला होता, आयर्लंड दौऱ्यावर त्यानेही चमकदार कामगिरी करत संघात जागा मिळवली.

आशिया कप 2023 साठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, केएल राहुल, ईशान किशन, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा.

राखीव खेळाडू | संजू सॅमसन (राखीव विकेटकीपर)