मुंबई : आशिया कप 2023 स्पर्धेत भारत आणि बांगलादेश यांच्यात सामना होत आहे. भारताने अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चित केलं आहे. तर बांगलादेशनं दोन पराभवांसह आपला गाशा गुंडाळला आहे. त्यामुळे या सामन्यात काही प्रयोग पाहायला मिळू शकतात. हा सामना देखील प्रेमदासा मैदानातच होणार आहे. या मैदानात टीम इंडियाने जबरदस्त कामगिरी केली आहे. पाकिस्तान आणि श्रीलंकेला पराभवाची धूळ चारली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात 213 धावा केल्या होत्या आणि टीम इंडियाने त्यांना 172 धावांवरच रोखलं. या खेळपट्टीवर फिरकीची जादू चालली. कुलदीप यादवने आपल्या फिरकीत दिग्गज फलंदाजांना बरोबर गुंडाळलं. त्यामुळे बांगलेदश विरुद्धचा सामना भारताच्या पारड्यात झुकलेला आहे, असं म्हंटलं वावगं ठरणार नाही. बांगलादेश आणि भारत यांच्यात एकूण 39 सामने झाले आहेत. यापैकी 31 सामन्यात भारताने, तर 7 सामन्यात बांगलादेशने विजय मिळवला आहे.
आर. प्रेमदासा स्टेडियममध्ये फलंदाजांना चांगली मदत झाली आहे. पाकिस्तान विरुध्दच्या सामन्यात टीम इंडियाच्या फलंदाजांनी धावांचा डोंगर उभा केला. त्यानंतर श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात दुसऱ्या खेळपट्टीवर धावा केल्या. मात्र फिरकीची जादू दिसून आली. त्यामुळे या खेळपट्टी धावांचा पाठलाग करणं सोपं होईल असा अंदाज आहे. या सामन्यावरही पावसाचं सावट असणार आहे. पहिल्यांदा फलंदाजी करणारा संघ 260 धावापर्यंत मजल मारू शकतो. तर धावांचा पाठलाग करणारा संघाची विजयी टक्केवारी 40 इतकीच आहे.
भारत: रोहित शर्मा कर्णधार, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल (विकेटकीपर), इशान किशन, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
बांग्लादेश: मोहम्मद नईम, मेहदी हसन, लिटन दास, शकीब अल हसन (कर्णधार), तौहिद हृदयॉय, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), शमीम हुसेन, नसुम अहमद, तस्किन अहमद, शोरीफुल इस्लाम, हसन महमूद.
हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह कर्णधारपदासाठी योग्य खेळाडू ठरतील. तर तस्किन अहमद आणि मेहदी हसन हे देखील साजेशी कामगिरी करतील. हसन महमूद आणि मोहम्मद सिराज चांगली भूमिका बजावू शकतात.
लकी इलेव्हन1- केएल राहुल (विकेटकीपर), रोहित शर्मा, विराट कोहली, शुबमन गिल,नईम शेख, शाकीब अल हसन (कर्णधार), हार्दिक पांड्या, मेहदी हसन मिराज, तस्किन अहमद, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), कुलदीप यादव
लकी इलेव्हन2- केएल राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली, शुबमन गिल, शाकिब अल हसन, हार्दिक पांड्या (उपकर्णधार), मेहदी हसन मिराज (कर्णधार), अक्षर पटेल, तस्किन अहमद, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव.