ममुंबई : आशिया कपमध्ये भारत आणि नेपाळमध्ये होणार आहे. दोन्ही संघांनी अजून पहिला विजय मिळवला नाही. टीम इंडियाचा पाकिस्तानविरूद्धचा सामना पावसामुळे रद्द झालेला. तर नेपाळ संघाला पाकिस्तानने पहिल्या सामन्यात पराभूत केलं होतं. त्यामुळे रोहितसेना आपल्या पहिल्या विजयासाठी सज्ज असणार आहे. नेपाळ आणि भारतामध्ये पहिला सामना होत असून सुपर 4 मध्ये जागा मिळवायची असेल कर दोन्ही संघाना विजय मिळवावा लागणार आहे.
टीम इंडिया आणि नेपाळमधील सामना कधी आणि किती वाजता सुरू होणार आहे. तर हा सामना 4 सप्टेंबरला श्रीलंकेमधील पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर दुपारी 3 वाजता सुरू होणार आहे. भारत विरुद्ध नेपाळ सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्सवर भारतात होणार आहे.
भारत विरुद्ध नेपाळमधील हा सामना मोबाईलवर अगदी फुकट पाहता येईल. त्यासाठी तुम्हाला हॉटस्टार एप डाऊनलोड करावा लागेल. मात्र तुम्हाला लॅपटॉपवर फुकटात पाहता येणार नाही. त्यासाठी तुम्हालाा पेड सबस्क्रिप्शन घ्यावं लागेल.
आशिया कपसाठी नेपाळ टीम | रोहित पौडेल (कॅप्टन), आसिफ शेख, कुशल भुर्टेल, ललित राजबंशी, भीम सार्की, कुशल मल्ला, दीपेंद्र सिंह ऐरी, संदीप लामिछाने, करण केसी, गुलशन झा, सोमपाल कामी, आरिफ शेख, प्रतीस जीसी, किशोर महतो, संदीप जोरा, अर्जुन सऊद आणि श्याम ढकाल.
आशिया कप 2023 साठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, ईशान किशन, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि संजू सॅमसन (राखीव विकेटकीपर).