IND- BAN सामन्याआधी आणखी एक खेळाडू मायदेशी, बुमराहनंतर या” खेळाडूच्या घरी चिमुकलीचं आगमन

| Updated on: Sep 14, 2023 | 10:31 AM

भारताचा यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह घरी गेला होता. नेपाळविरूद्धच्या सामन्यात त्याने माघार घेत मुंबईमध्ये तो परतला होता. आता आणखी एक खेळाडू भारत बांगलादेश सामन्याआधी मायदेशी परतला आहे.

IND- BAN सामन्याआधी आणखी एक खेळाडू मायदेशी, बुमराहनंतर या खेळाडूच्या घरी चिमुकलीचं आगमन
Follow us on

मुंबई : आशिया कप 2023 च्या फायनलध्ये भारतीय संघाने धडक मारली आहे. 17 सप्टेंबरला फायनल होणार असून त्याआधी भारताचा सामना बांगलादेशसोबत होणार आहे. या सामन्याआधी आणखी एका खेळाडूच्या घरी चिमुकल्याचं आगमन झालं आहे. याआधी भारताचा यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह घरी गेला होता. नेपाळविरूद्धच्या सामन्यात त्याने माघार घेत मुंबईमध्ये तो परतला होता. बुमराहला मुलगा झाला होता. जसप्रीतने आपल्या बाळाचंही नाव ठेवत सोशल मीडियावर पोस्ट केलेली. ‘अंगद’ असं बुमराहने आपल्या बाळाचं नाव ठेवलं होतं. आता आणखी एक खेळाडू भारत बांगलादेश सामन्याआधी मायदेशी परतला आहे.

कोण आहे तो खेळाडू?

हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून मुशफिकुर रहीम असून त्याला मुलगी झाली आहे. मुशफिकुरने सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. देवाने आम्हाला मुलगी दिली असून आई आणि मूल दोघे डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली असून दोघींना आशिर्वाद द्या, असं मुशफिकुर रहीमने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

 

मुशफिकुर रहीम हा संघातील महत्त्वाच्या खेळाडूंपैकी एक असून आता तो भारताविरूद्ध्यच्या होणाऱ्या सामन्यात खेळताना दिसणार नाही. टीम मॅनेजमेंटने त्याच्या जागी कोणत्या खेळाडूला संधी देणार की नाही याबाबत कोणतीही घोषणा केली नाही. बांगलादेश संघ याधीच आशिया कपमधून बाहेर पडला आहे. मात्र शेवटचा सामना गोड करण्यासाठी ते आपली पूर्ण ताकद लावू शकतात.

बांगलादेशकडून खेळताना रहीम याने 443 सामने खेळले असून त्यामध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 14112 धावा केल्या आहेत. यामधील वन डे मध्ये 7388 धावा, कसोटीमध्ये 5553 आणि टी-20 मध्ये 1500 धावा केल्यात.

शकीब अल हसन (कर्णधार), मोहम्मद नईम, मेहदी हसन मिराज, लिटन दास, तौहीद हृदोय, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), शमीम हुसेन, अफिफ हुसैन, तस्किन अहमद, शोरीफुल इस्लाम, हसन महमूद, मुस्तफिजुर रहमान, नसुम अहमद, महेदी हसन, तन्झीद हसन, तन्झीम हसन साकिब, एनामुल हक.