मुंबई | क्रिकेट विश्वात येत्या काही दिवसात 2 महत्वाच्या स्पर्धा पार पडणार आहेत. एक म्हणजे आशिया कप आणि 2 म्हणजे आयसीसी वनडे वर्ल्ड कप. आशिया कप स्पर्धेला 30 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. तर 5 ऑक्टोबरपासून वर्ल्ड कपला सुरुवात होतेय. स्पर्धेत टीम इंडिया, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि नेपाळ हे 6 संघ खेळणार आहेत. आशिया कप स्पर्धेचं आयोजन हे श्रीलंका आणि पाकिस्तानमध्ये करण्यात आलं आहे. स्पर्धेत एकूण 13 सामने पार पडणार आहेत. या पैकी फक्त 4 मॅच या पाकिस्तानमध्ये होणार आहे. तर उर्वरित 9 मॅचेस श्रीलंकेत पार पडतील.
आशिया कपसाठी टीमची घोषणा करण्यात आली. टीममध्ये अर्जुनला संधी देण्यात आली आहे. तर कॅप्टन रोहित असणार आहे. अर्जुन रोहितच्या कॅप्टन्सीत खेळणार आहे. आशिया कप 2023 साठी नेपाळ क्रिकेट टीमने 14 ऑगस्ट रोजी 17 सदस्यीय संघ जाहीर केला. नेपाळ क्रिकेट टीमची जबाबदारी ही रोहित पौडेल याच्याकडे देण्यात आली आहे. तर या रोहित पौडेलच्या नेतृत्वात अर्जुन सऊद खेळणार आहे.
आशिया कपसाठी नेपाळ क्रिकेट टीम
The Cricket Association of Nepal (CAN) has announced the final squad for the upcoming Asia Cup 2023.
The Nepal team will go through a week-long preparation camp in Pakistan, where the team will train and play matches against PCB-designated teams. pic.twitter.com/yWt4ZDyogx
— CAN (@CricketNep) August 14, 2023
अर्जुन सउदने आतापर्यंत नेपाळकडून 12 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. अर्जुनने या 12 पैकी 9 वनडे सामन्यांमध्ये 174 धावा केल्या आहेत. अर्जुनने यामध्ये 1 अर्धशतक ठोकलं आहे. तर 3 टी सामन्यांमध्ये 23 च्या सरासरीने 70 रन्स केल्या आहेत.
दरम्यान आशिया कपसाठी नेपाळ टीमची सूत्र ही रोहित पौडेल याच्याकडे देण्यात आली आहे. रोहितचं वय अवघं 20 वर्ष इतकं आहे. रोहितने आतापर्यंत 27 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये नेतत्व केलं आहे. त्यामुळेच रोहितला नेतृत्व दिलं गेलं आहे.
आशिया कपसाठी नेपाळ टीम | रोहित पौडेल (कॅप्टन), आसिफ शेख, कुशल भुर्टेल, ललित राजबंशी, भीम सार्की, कुशल मल्ला, दीपेंद्र सिंह ऐरी, संदीप लामिछाने, करण केसी, गुलशन झा, सोमपाल कामी, आरिफ शेख, प्रतीस जीसी, किशोर महतो, संदीप जोरा, अर्जुन सऊद आणि श्याम ढकाल.