कोलंबो | आशिया कप 2023 स्पर्धेतील सुपर 4 फेरीला सुरुवात झालीय. आशिया कप सुपर 4 साठी टीम इंडिया, पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका या 4 संघांनी क्वालिफाय केलंय. तर सुपर 4 मधील पहिल्या सामन्यात पाकिस्तान क्रिकेट टीमने बांगलादेशवर 7 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. आता या सुपर 4 मधील दुसरा सामना हा 9 सप्टेंबर रोजी खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात श्रीलंका विरुद्ध बांगलादेश आमनेसामने असणार आहेत. बांगलादेशला आव्हान कायम राखण्यासाठी सामना जिंकावा लागणार आहे. मात्र या सामन्यात पाऊस आला तर खेळ बदलू शकतो.
या संपूर्ण स्पर्धेत आतापर्यंत पावसाने अनेकदा खोडा घातलाय. टीम इंडिया-पाकिस्तान यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. तर नेपाळ विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाला सुधारित आव्हान मिळालं. या स्पर्धेतील एकाही सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही अगदी फायनलसाठीही. त्यामुळे अंतिम सामना पावसामुळे रद्द झाला तर विजेता कोण असणार, असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला आहे. याबाबत आपण जाणून घेऊयात.
सध्या सुपर 4 राउंड सुरु आहेत. प्रत्येकी टीम एकमेकांविरुद्ध प्रत्येकी 1 आणि एकूण 3 मॅच खेळणार आहे. दोन्ही ग्रुपमधील अव्वल संघ फायनलसाठी क्वालिफाय करतील. कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये 17 सप्टेंबर रोजी हा सामना होईल. अंतिम सामना पावसामुळे रद्द झाल्यास दोन्ही संघांना विजेता घोषित करण्यात येणार आहे. तसेच ट्रॉफी शेअर करण्यात येईल.
दरम्यान आशिया कप सुपर 4 मध्ये टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान 10 सप्टेंबरला पहिल्यांदा आणि एकूण दुसऱ्यांदा आमनेसामने असणार आहेत. टीम इंडिया-पाक यांच्यातील पहिला सामना हा पावसामुळे रद्द झाला होता. पावसामुळे दुसऱ्या डावातील खेळ होऊ शकला नव्हता. त्यामुळे आता या दुसऱ्या सामन्याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
आशिया कपसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, केएल राहुल, ईशान किशन, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि संजू सॅमसन (राखीव विकेटकीपर).