IND vs PAK : “भारत विरुद्धच्या सामन्यात आमची बाजू भक्कम आणि..”, बाबर आझम याने रोहित सेनेला दिला असा इशारा

| Updated on: Sep 09, 2023 | 4:13 PM

Asia Cup 2023, India Vs Pakistan : आशिया कप 2023 स्पर्धेतील सुपर 4 फेरीत भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ भिडणार आहे. या सामन्यापूर्वीच शाब्दिक चकमक सुरु झाली आहे. आता बाबर आझम याने थेट रोहित सेनेला आव्हान दिलं आहे.

IND vs PAK : भारत विरुद्धच्या सामन्यात आमची बाजू भक्कम आणि.., बाबर आझम याने रोहित सेनेला दिला असा इशारा
IND vs PAK : सुपर 4 फेरीतील भारत पाक सामन्यापूर्वी बाबर आझम याचं थेट आव्हान, म्हणाला...
Follow us on

मुंबई : आशिया कप 2023 स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान दुसऱ्यांदा आमनेसामने येणार आहेत. पहिला सामना पावसामुळे रद्द करावा लागला होता. आता दोन्ही संघांनी पुन्हा एकदा कंबर कसली आहे. या सामन्यापूर्वी दोन्ही देशातील आजी माजी खेळाडूंकडून शाब्दिक चकमक सुरु आहे. यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमही मागे नाही. सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पाकिस्तानची बाजू भक्कम असल्याचं सांगितलं. तसेच सामन्यात भारताला पराभूत करण्यासाठी कोणत्या गोष्टी अनुकूल ठरतील याबाबतही स्पष्टीकरण दिलं आहे. श्रीलंकेत खेळणं भारताच्या पथ्यावर पडेल असं त्याने मुद्द्यानिशी पटवून देण्याचा प्रयत्न केला.

काय म्हणाला बाबर आझम?

“आमच्या टीमची बाजू एकदम भक्कम आहे. कारण आम्ही श्रीलंका आणि पाकिस्तान या दोन्ही ठिकाणी खेळलो आहोत. त्यामुळे इथली परिस्थिती आम्हाला भारतापेक्षा चांगल्या प्रकारे माहिती आहे. आम्ही श्रीलंकेत दोन महिन्यांपासून क्रिकेट खेळत आहोत. आम्ही इथे कसोटी मालिका खेळलो. त्यानंतर लंका प्रीमियरमध्ये भाग घेतला आणि आता आशिया कप स्पर्धेपूर्वीआम्ही अफगाणिस्तानला 3-0 ने पराभूत केलं होतं. त्यामुळे भारतापेक्षा आमचं पारडं जड आहे.”, असं पाकिस्तान कर्णधार बाबर आझम म्हणाला.

“आशिया कप स्पर्धेसाठी आम्हाला इतका प्रवास करावा लागेल हे माहिती होतं. यासाठी आम्ही खेळाडूंची काळजी घेतली. आम्ही सर्वकाही ठरवल्याप्रमाणे केलं आहे. आम्ही गोलंदाजीत चांगली सुरुवात केली. तसेच मधल्या टप्प्यात चांगल्या गोलंदाजीचा प्रयत्न करू.”, असंही बाबर आझम याने पुढे सांगितलं.

भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात झालेल्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाचे आघाडीचे फलंदाज सपशेल अपयशी ठरले होते. शाहीन आफ्रिदीने रोहित, विराट यांना तंबूचा रस्ता दाखवला होता. त्यामुळे दुसऱ्या सामन्यातही पाकिस्तानी कर्णधार बाबर आझमला तशीच अपेक्षा आहे.

आशिया कपसाठी भारतीय स्क्वॉड: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, तिलक वर्मा, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.

आशिया कपसाठी पाकिस्तान स्क्वॉड: अब्दुल्ला शफिक, बाबर आझम (कर्णधार), फखर झमान, इमाम उल हक, सौद शकील, तय्यब ताहीर, सलमान अली आघा, फहीम अश्रफ, इफ्तिखार अहमद, मोहम्मद नवाज, शादाब खान, मोहम्मद हरिस (विकेटकीपर), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), हरिस रौफ, मोहम्मद वासिम, नसीम शाह, शाहीन आफ्रिदी, उस्मा मिर.