कोलंबो | बहुप्रतिक्षित आशिया कप 2023 स्पर्धेला 30 ऑगस्टपासून सुरुवात झाली. टीम इंडिया आशिया कपमधील आपला पहिला सामना हा 2 सप्टेंबर रोजी पाकिस्तान विरुद्ध खेळणार आहे. पाकिस्तानने या स्पर्धेत विजयी सुरुवात केली आहे. पाकिस्तानने नेपाळलला पराभूत केलं. नेपाळ विरुद्ध पाकिस्तानच्या गोलंदाज आणि फलंदाजांनी सुपर कामगिरी केली. त्यामुळे भारत विरुद्धच्या सामन्याआधी पाकिस्तानचा विश्वास वाढलेला आहे. मात्र आता पाकिस्तानसमोर टीम इंडियाचं आव्हान आहे. त्यामुळे काँटे की टक्कर होणार हो निश्चित आहे. आतापर्यंत पाकिस्तान विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील आकडे आपण जाणून घेणार आहोत.
टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान हे दोन्ही संघ 2019 वर्ल्ड कपमध्ये मँचेस्टर इथे आमनेसामने आले होते. टीम इंडियाने त्या सामन्यात विजय मिळवला होता. त्यानंतर आता 4 वर्षांनी महामुकाबला होणार आहे. आता हा सामना जिंकून पाकिस्तानला सुपर 4 मध्ये पोहचण्याची संधी आहे. तर टीम इंडिया विजयी सुरुवात करण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल.
आशिया कपच्या इतिहासात टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान असा एकूण 13 वेळा सामना रंगला आहे. टीम इंडिया पाकिस्तानवर वरचढ राहिली आहे. टीम इंडियाने पाकिस्तानचा 7 सामन्यात धुव्वा उडवला आहे. तर पाकिस्तानने 5 वेळा पराभवाची परतफेड केली आहे. एक सामना हा निकाली निघाला नाही. आकडे पाहता टीम इंडियाच पाकिस्तानवर वरचढ आहे. मात्र क्रिेकटमध्ये कधी काय होईल सांगता येत नाही. त्यामुळे सामना कोण जिंकणार हे लवकरच स्पष्ट होईल.
पाकिस्तान प्लेईंग इलेव्हन | बाबर आजम (कॅप्टन), शादाब खान (उप कर्णधार), फखर जमान, इमाम उल हक, मोहम्मद रिजवान, इफ्तिखार अहमद, सलमान अगहा, मोहम्मद नवाझ, शाहीन अफ्रीदी, नसीम शाह आणि हारिस रऊफ.
आशिया कप 2023 साठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, ईशान किशन, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि संजू सॅमसन (राखीव विकेटकीपर).