पल्लेकेले | टीम इंडियाने आशिया कपमधील तिसऱ्या सामन्यात पाकिस्तान विरुद्ध टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतलाय. टीम इंडियाकडून युवा शुबमन गिल आणि कॅप्टन रोहित शर्मा ही जोडी ओपनिंगला आली आहे. कॅप्टन रोहितने महत्त्वाच्या सामन्यात प्लेईंग इलेव्हनबाबत मोठे निर्णय घेतले आहे. रोहितने केएल राहुल उपलब्ध नसल्याने त्याच्या जागी इशान किशन याला विकेटकीपर म्हणून संधी दिली आहे. तर सूर्यकुमार यादव याला श्रेयस अय्यर याच्यासाठी त्याग करावा लागला आहे.
टीम इंडियात एका घातक गोलंदाजाची एन्ट्री झाली आहे. त्यामुळे पाकिस्तानचं टेन्शन वाढलं आहे. यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह याचं वनडे टीममध्ये 1 वर्ष, 1 महिना आणि 18 दिवसांनी अर्थात 414 दिवसांनी कमबॅक झालं आहे. बुमराह याने अखेरचा वनडे सामना हा इंग्लंड विरुद्ध 14 जुलै 2022 रोजी खेळला होता. मात्र त्यानंतर बुमराह दुखापतीच्या कचात्यात अडकला. बुमराहने जवळपास वर्षभराने आयर्लंड विरुद्धच्या टी 20 मालिकेत कमबॅक केलं.
बुमराहने आतापर्यंत 72 सामन्यांमध्ये 24.30 च्या सरासरीने 121 विकेट्स घेतल्या आहेत. बुमराहने टीम इंडियाला आतापर्यंत अनेकदा एकहाती सामने जिंकून दिले आहेत. वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर टीम इंडियासाठी आशिया कप अतिशय महत्त्वाची स्पर्धा आहे. त्यामुळे बुमराह या स्पर्धेतून धारदार बॉलिंग करण्याचा प्रयत्न करणार आहे.
जसप्रीत बुमराह याने पाकिस्तान विरुद्ध 5 वनडे सामने खेळले आहेत. बुमराहने या 5 मॅचमध्ये 4 विकेट्स घेतल्या आहेत. विशेष म्हणजे बुमराहने हे 4 विकेट्स फक्त 2 सामन्यात घेतले आहेत. याचाच अर्थ असा की 3 सामन्यात बुमराहला विकेट घेण्यात अपयश आलं आहे. बुमराह पाकिस्तान विरुद्ध पहिला सामना हा 2017 च्या चॅम्पियन ट्रॉफीमध्ये खेळला होता.
पाकिस्तान प्लेईंग इलेव्हन | बाबर आजम (कॅप्टन), शादाब खान (उपकर्णधार), फखर जमान, इमाम उल हक, मोहम्मद रिजवान, इफ्तिखार अहमद, सलमान अगहा, मोहम्मद नवाझ, शाहीन अफ्रीदी, नसीम शाह आणि हारिस रऊफ.
टीम इंडिया प्लेईंग इलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.