पल्लेकेले | आशिया कपमधील पहिला सामना हा पाकिस्तानने जिंकला. त्यांनी नेपाळला मोठ्या फरकाने पराभूत केलं. दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेने बांगलादेशवर 5 विकेट्सने विजय मिळवला. तिसरा सामना हा पाकिस्तान विरुद्ध टीम इंडिया यांच्यात होता. टीम इंडियाने पाकिस्तानला विजयासाठी 267 धावांचं आव्हान दिलं. मात्र हा महामुकाबला पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे दोन्ही संघांना 1-1 पॉइंट देण्यात आला. त्यामुळे पाकिस्ताचे 3 पॉइंट्स झाले. पाकिस्तानने यासह सुपर 4 मध्ये एन्ट्री केली. त्यामुळे आता पाकिस्तान विरुद्ध टीम इंडिया आशिया कपमध्ये पुन्हा आमनेसामने येणार असल्याचे संकेत आहेत.
आशिया कप 2023 मध्ये यंदा नेपाळने पहिल्यांदा क्वालिफाय केलं. त्यामुळे आशिया कपमध्ये सहभागी संघांची संख्या एकूण 6 आहे. टीम इंडिया, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि नेपाळ असे 6 संघ आहेत. हे 6 संघ 3-3 अशा पद्धतीने 2 ग्रुपमध्ये विभागण्यात आले आहेत. त्यानुसार टीम इंडिया, पाकिस्तान आणि नेपाळ ए ग्रुपमध्ये आहेत. तर बी ग्रुपमध्ये श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान टीम आहेत.
दोन्ही ग्रुपमधून टॉप 2 टीम सुपर 4 साठी क्वालिफाय करतील. तर 2 संघांचं पॅकअप होईल. त्यानंतर सुपर 4 राऊंडला सुरुवात होईल. आता सुपर 4 मध्ये टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान सामना होऊ शकतो. या सुपर 4 नंतर 17 सप्टेंबर रोजी अंतिम सामना पार पडणार आहे.
टीम इंडिया प्लेईंग इलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
पाकिस्तान प्लेईंग इलेव्हन | बाबर आजम (कॅप्टन), शादाब खान (उपकर्णधार), फखर जमान, इमाम उल हक,
मोहम्मद रिजवान, इफ्तिखार अहमद, सलमान अगहा, मोहम्मद नवाझ, शाहीन अफ्रीदी, नसीम शाह आणि हारिस रऊफ.