कोलंबो | आशिया कप 2023 स्पर्धेतील सुपर 4 मधील तिसऱ्या सामन्यात पाकिस्तान विरुद्ध टीम इंडिया हे कट्टर आणि पारंपरिक प्रतिस्पर्धी आमनेसामने आहेत. या सामन्याचं आयोजन हे कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये करण्यात आलंय. टीम इंडियाचा सुपर 4 मधील हा पहिला सामना आहे. तर पाकिस्तानचा दुसरा सामना आहे. पाकिस्तानने सुपर 4 मधील पहिल्या सामन्यात बांगलादेशवर 7 विकेट्सने विजय मिळवला आहे. त्यामुळे पाकिस्तान टीम इंडिया विरुद्ध विजय मिळवून फायनलचा दावा आणखी मजबूत करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला टीम इंडियाचा सुपर 4 मध्ये विजयी सुरुवात करण्याच्या प्रयत्न असणार आहे.
पाकिस्तान क्रिकेट टीमने या हायव्होल्टेज सामन्यात टॉस जिंकला आहे. टीम इंडियाने टॉस गमावला असला तरी दोन्ही कर्णधारांना जे हवं होत तेच मिळालंय. त्यामुळे दोन्ही कर्णधार आनंदी आहेत. पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझम याने टॉस जिंकून टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडलंय. टीम इंडियाने या अतिशय महत्त्वाच्या सामन्यात प्लेईंग ईलेव्हनमध्ये 2 बदल केले आहेत. श्रेयस अय्यर याच्या जागी के एल राहुल याला संधी देण्यात आली आहे. तर जसप्रीत बुमराह टीममध्ये परतल्याने मोहम्मद शमीला बाहेर पडावं लागलं आहे.
टीम इंडिया-पाकिस्तानचे 11 शिलेदार
Pakistan wins the toss and elects to field first in Colombo! 🌞 The pitch looks dry and promises early movement for the seamers, with spin likely to play a big role later on.
Who will come out on top in this thrilling showdown? 🇮🇳🇵🇰#AsiaCup2023 #PAKvIND pic.twitter.com/ibM3r4VWbX
— AsianCricketCouncil (@ACCMedia1) September 10, 2023
जसप्रीत बुमराह साखळी फेरीतील सामन्यानंतर आपल्या पहिल्या मुलाच्या जन्मासाठी मायदेशी परतला होता. त्यामुळे नेपाळ विरुद्धच्या सामन्यासाठी बुमराहच्या जागी मोहम्मद शमी याचा प्लेईंग ईलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला होता. तर पाक विरुद्ध ईशान किशन आणि केएल राहुल या 2 विकेटकीपर बॅट्समनपैकी प्लेईंग ईलेव्हनमध्ये कुणाला संधी मिळणार, याबाबत जोरदार चर्चा होती. मात्र कॅप्टन रोहित शर्माने मोठा गेम केला. रोहितने या दोघांना संधी दिली. तर केएलसाठी श्रेयसला बाहेरचा रस्ता दाखवला.
तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तानने प्लेईंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. कॅप्टन बाबर आझम याने आपल्या त्या 10 खेळाडूंवरच विश्वास दाखवला आहे. विशेष बाब म्हणजे पाकिस्तानने आशिया कप 2023 मध्ये यावेळेसही या सामन्याच्या एक दिवसआधी 9 सप्टेंबर रोजी प्लेईंग ईलेव्हन जाहीर केली.
दरम्यान हे दोन्ही कट्टर संघ या आशिया कप 2023 स्पर्धेत आमनेसामने येण्याची दुसरी वेळ आहे. याआधी टीम इंडिया-पाकिस्तान 2 सप्टेंबर रोजी भिडले होते. टीम इंडियाने पाकिस्तानला विजयासाठी 267 धावांचं आव्हान दिलं होतं. टीम इंडियाने 48.5 ओव्हरमध्ये ऑलआऊट 266 धावा केल्या होत्या. मात्र पावसामुळे पाकिस्तानच्या बॅटिंगच आली नाही. पाऊस थांबत नसल्याने हा सामना रद्द करण्यात आला. दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 पॉईंट देण्यात आला.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
पाकिस्तान प्लेईंग ईलेव्हन | बाबर आझम (कॅप्टन), फखर जमान, इमाम-उल-हक, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), आगा सलमान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह आणि हरिस रउफ