IND vs PAK | कॅप्टन रोहित शर्मा याचा सूर्यकुमार यादव याला संधी न देण्याचा निर्णय चुकला?

| Updated on: Sep 02, 2023 | 5:29 PM

Suyrakumar Yadav India vs Pakistan | पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात टीम इंडिया प्लेईंग इलेव्हनमध्ये कॅप्टन रोहित शर्मा याने सूर्यकुमार यादव याला संधी दिली नाही. त्यामुळे रोहितच्या या निर्णयाविरुद्ध नाराजी आहे.

IND vs PAK | कॅप्टन रोहित शर्मा याचा सूर्यकुमार यादव याला संधी न देण्याचा निर्णय चुकला?
सर्व फलंदाज आले की सेट होतात मात्र आमचा सूर्या भाऊ आतूनच सेट होऊन येतो. आतापर्यंत त्याने 1841 धावा केल्या आहेत. यामध्ये गड्याने 172. 70 च्या स्ट्राईक रेटने धावा काढल्या आहेत.
Follow us on

पल्लेकेले | टीम इंडियाची आशिया कप 2023 मधील पहिल्या सामन्यात घसरगुंडी झाली आहे. पाकिस्तान विरुद्धच्या महामुकाबल्यात टीम इंडियाने विजयी सुरुवात केली. कॅप्टन रोहित शर्मा याने टॉस जिंकला. पाकिस्तान विरुद्ध पहिले बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार रोहित शर्मा आणि शुबमन गिल ओपनिंग जोडी मैदानात आली. या दोघांनी आतापर्यंत एकूण 650 पेक्षा अधिक धावांची भागीदारी केलीय. त्यामुळे हा महत्त्वाच्या सामन्यात दोघांकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र टीम इंडियाला अपेक्षित सुरुवात देण्यात अपयश आलं. इतकंच नाही, टीम इंडियाची घसरगुंडी झाली.

टीम इंडियाची वाईट सुरुवात

सामन्याला सुरुवात झाली. काहीच ओव्हरनंतर पाऊस आला. खेळ थांबवण्यात आला. त्यामुळे रोहित आणि शुबमन गिलच्या बॅटिंगमध्ये खंड पडला. पाऊस झाल्याने पीचमध्ये बदल झाला, ज्याचा फटका टीम इंडियाला बसला. शाहिन अफ्रिदी याने रोहितला काही बॉलवर बिट केलं, त्यानंतर त्याच्या दांड्या गुल केल्या. रोहित 11 धावांवर आऊट झाला. रोहितनंतर विराट कोहली मैदानात आला.

हे सुद्धा वाचा

विराटकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र विराटही शाहिनच्या धारदार बॉलिंगसमोर टिकू शकला नाही. विराटच्या बॅटला कट लागून तो बोल्ड झाला. विराटनंतर श्रेयस अय्यर मैदानात आला. श्रेयसने दुखापतीनंतर 8 महिन्यांनी टीममध्ये कमबॅक केलं. श्रेयसने 15 जानेवारी 2023 ला श्रीलंका विरुद्ध अखेरचा वनडे सामना खेळला होता. त्यानंतर श्रेयस दुखापतीच्या कचाट्यात सापडला.

श्रेयसचं कमबॅक आणि फ्लॉप

श्रेयसने दुखापतीवर मात केली. श्रेयस पूर्णपणे फिट झाला. त्याची आशिया कपसाठी निवड करण्यात आली. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यासाठी कॅप्टन रोहितने सूर्यकुमार यादव याला बाहेर बसवून श्रेयसला संधी दिली. आता रोहित-विराट झटपट आऊट झाल्यानंतर श्रेयसवर मोठी जबाबदारी होती. श्रेयसला हिरो होण्याची संधी होती. पण श्रेयसही फ्लॉप ठरला.

हरीस रौफ याने श्रेयस अय्यर याला क फखर झमान याच्या हाती कॅच आऊट केलं. श्रेयसने 9 बॉलमध्ये 2 चौकारांच्या मदतीने 14 धावा केल्या. श्रेयस स्वस्तात आऊट झाल्याने आता कॅप्टन रोहितने सूर्यकुमारला बाहेर बसवल्याचा निर्णय चुकीचा ठरवला आहे. सूर्याला न खेळवल्याने नेटकरी संतप्त झाले आहेत.

सूर्याकुमार यादव याला संधी नाही

पाकिस्तान प्लेईंग इलेव्हन | बाबर आजम (कॅप्टन), शादाब खान (उपकर्णधार), फखर जमान, इमाम उल हक, मोहम्मद रिजवान, इफ्तिखार अहमद, सलमान अगहा, मोहम्मद नवाझ, शाहीन अफ्रीदी, नसीम शाह आणि हारिस रऊफ.

टीम इंडिया प्लेईंग इलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.