नेपाळ | आशिया कप 2023 स्पर्धेला आजपासून 30 ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. स्पर्धेतील पहिला सामना हा पाकिस्तान विरुद्ध नेपाळ यांच्यात पार पडणार आहे. बाबर आझम हा पाकिस्तानचं नेतृत्व करणार आहे. तर रोहित पौडेल याच्याकडे नेपाळ क्रिकेट संघाची सूत्रं आहेत. या सामन्यासाठी पाकिस्तानने टॉस जिंकला आहे. कॅप्टन बाबर आझम याने टॉस जिंकला आहे. बाबरने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला आहे.
Babar Azam wins the toss and Pakistan will bat first against Nepal in the #AsiaCup2023 opener 🏏#PAKvNEP | 📝: https://t.co/llGpHvCtMs pic.twitter.com/WVO3XzBwcK
— ICC (@ICC) August 30, 2023
नेपाळ विरुद्धच्या सामन्यासाठी पाकिस्तानने एकदिवसआधीच प्लेईंग इलेव्हन जाहीर केली होती. कॅप्टन बाबरला टॉस दरम्यान नेमका याबाबतच प्रश्न विचारण्यात आला. “या निर्णयमागे विशेष असं कारण नाही.आमच्या खेळाडूंचा विश्वास वाढावा यासाठीच हा निर्णय घेतला”,असं बाबरने स्पष्ट केलं. पाकिस्तानने प्लेईंग इलेव्हनमध्ये कोणताच बदल केलेला नाही. पाकिस्तानने टीममध्ये तेच खेळाडू ठेवलेत जे अफगाणिस्तान विरुद्धच्या मालिकेतील प्लेईंग इलेव्हनमध्ये होते. बाबरने आपल्या विजेत्या संघावर विश्वास दाखवत कोणताही बदल केला नाही.
तर दुसऱ्या बाजूला नेपाळ क्रिकेटचा कॅप्टन रोहित पौडेल याने प्लेईंग इलेव्हनमध्ये भरोशाच्या खेळाडूंना संधी दिलीय. त्यामुळे आता नेपाळचे हे 11 शिलेदार पाकिस्तानला कशाप्रकारे आव्हान देतात, याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे.
दरम्यान नेपाळने यंदा पहिल्यांदाच आशिया कपसाठी क्वालिफाय केलंय. नेपाळचा हा आशिया कपमधील पहिलाच सामना आहे. पाकिस्तान विरुद्ध नेपाळ यांच्यात आतापर्यंत एकदाही वनडे फॉर्मेट आशिया कपमध्ये आमनासामना झालेला नाही.
नेपाळ विरुद्धच्या सामन्यासाठी पाकिस्तान प्लेईंग इलेव्हन | बाबर आझम (कॅप्टन), शादाब खान (उपकर्णधार), फखर झमान, इमाम उल हक, सलमान अली आघा, इफ्तिखार अहमद, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), मोहम्मद नवाझ, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी आणि हरीस रौफ
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यासाठी नेपाळ प्लेईंग इलेव्हन | रोहित पौडेल (कॅप्टन), कुशल भुरटेल, आसिफ शेख (विकेटकीपर), कुशल मल्ला, दीपेंद्र सिंह आयरी, गुलशन झा, सोमपाल कामी, करण केसी, संदीप लामिछाने आणि ललित राजबंशी.