कोलंबो | आशिया कप 2023 सुपर 4 फेरीतील पाचवा सामना गुरुवारी 14 सप्टेंबरला पार पडणार आहे. या सामन्यात पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका आमनेसामने असणार आहेत. दोन्ही संघांसाठी हा सामना अतिशय महत्त्वाचा आहे. कारण हा सामना जिंकणारी टीम आशिया कप फायनलमध्ये पोहचणार आहे. हा सामना जिंकणारा संघ अंतिम फेरीत टीम इंडिया विरुद्ध खेळेल. त्यामुळे आता हा सामना श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यासाठी प्रतिष्ठेचा आहे. त्यामुळे या सामन्याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
पाकिस्तान आणि श्रीलंका या दोन्ही संघांनी सुपर 4 फेरीत प्रत्येकी 2 सामने खेळले. त्यापैकी दोन्ही संघांनी प्रत्येकी 1 सामन्यात विजय मिळवला. तर 1 सामन्यात पराभव स्वीकारला. श्रीलंका आणि पाकिस्तान या दोन्ही संघांनी बांगलादेश विरुद्ध विजय मिळवला. तर टीम इंडियाकडूने दोन्ही संघ पराभूत झाले. त्यामुळे अंतिम फेरीसाठी श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात चुरस आहे.
दरम्यान एकदिवसीय क्रिकेटमध्ये श्रीलंका विरुद्ध पाकिस्तानचा वरचष्मा आहे. पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका यांच्यात आतापर्यंत एकूण 155 सामने खेळवण्यात आले आहेत. या 155 पैकी 92 सामने हे पाकिस्तानने जिंकले आहेत. तर श्रीलंका टीमला फक्त 38 सामन्यात विजय मिळवता आलाय. तर एक सामना हा बरोबरी सुटला.
दरम्यान पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने या अटीतटीच्या सामन्यासाठी काही तासांआधीच प्लेईंग ईलेव्हनची घोषणा केली आहे पाकिस्तानने यासह आम्ही या सामन्यासाठी सज्ज असल्याची गर्जनाच एका अर्थाने केली आहे.
श्रीलंका विरुद्धच्या सामन्यासाठी पाकिस्तान प्लेईंग ईलेव्हन |बाबर आझम (कॅप्टन), मोहम्मद हरिस, इमाम उल हक, मोहम्मद रिजवान (विकेटकीपर), सऊद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम जूनियर, शाहीन शाह अफ्रीदी आणि जमान खान.
आशिया कपसाठी श्रीलंका क्रिकेट टीम | दासुन शनाका (कॅप्टन), कुसल मेंडिस (उपकर्णधार), पाथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल जेनिथ परेरा, चरिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, सदीरा समरविक्रमा, महेश थिक्षाना, दुनिथ वेललागे, मथीशा पाथिराना, कसून राजिथा, दुशन हेमंथा, बिनुरा फर्नांडो आणि प्रमोद मधुशन.