कोलंबो | आशिया कप 2023 स्पर्धेतील सुपर 4 मधील सामन्यात आज 14 सप्टेंबर रोजी पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका आमनेसामने आहेत. हा सामना आर प्रेमदासा स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. हा सामना जिंकणारी टीम आशिया कप फायनलमध्ये टीम इंडिया विरुद्ध भिडेल. दोन्ही संघांना जिंकून फायनलमध्ये पोहचण्याची संधी आहे. त्यामुळे पाकिस्तान आणि श्रीलंका या दोन्ही संघांसाठी हा ‘करो या मरो’ असा सामना आहे. त्यामुळे या सामन्यात रंगत पाहायला मिळणार आहे. सामन्याला अपेक्षित वेळेप्रमाणे दुपारी 3 वाजता सुरुवात होणार आहे. तर 2 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणं अपेक्षित होतं. मात्र टॉसआधीच पु्न्हा पावसाने एन्ट्री घेतली. त्यामुळे अजून टॉस झालेला नाही. त्यामुळे या सामन्याचाही पावसामुळे विचका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आर प्रेमदासा स्टेडियममध्ये 10, 11 आणि 12 सप्टेंबर या 3 दिवस सलग पाऊस झाला. टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील (10 सप्टेंबर) मुख्य दिवशी पावसामुळे खेळ पूर्ण होऊ शकला नाहीत. त्यामुळे सामना राखीव दिवसात पोहचला. राखीव दिवशीही पाऊस झाला. त्यानंतर 12 सप्टेंबर रोजी टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका या सामन्यातही पाऊस झाला. आता पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका सामन्याआधीच पाऊसाने एन्ट्री घेतलीय.
पावसामुळे टॉसला विलंब
⚠️ Toss has been delayed due to wet outfield #PAKvSL | #AsiaCup2023 pic.twitter.com/FQ7Krw8ipZ
— Pakistan Cricket (@TheRealPCB) September 14, 2023
श्रीलंका आणि पाकिस्तान या दोन्ही संघांनी सुपर 4 मध्ये प्रत्येकी 2 सामने खेळले आहेत. दोघांनी 2 पैकी 1 सामन्यात विजय मिळवलाय. तर 1 सामना गमावलाय. मात्र पाकिस्तानला 11 सप्टेंबरला (राखीव दिवस) टीम इंडिया विरुद्ध 228 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. पाकिस्तानचा या पराभवामुळे नेट रनरेटवर वाईट परिणाम झाला. आता हाच नेट रनरेट पाकिस्तानचा पावसाच्या पाण्यात विसर्जन करणार आहे.
पावसामुळे पाकिस्तान-श्रीलंका सामना रद्द झाल्यास फायनलमध्ये कोण पोहचणार, असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला आहे. या प्रश्नाचं आहे श्रीलंका. कारण श्रीलंकेचा नेट रनरेट हा पाकिस्तानच्या तुलनेत चांगला आहे. श्रीलंकेचा नेट रनरेट हा -0.200 इतका आहे. तर पाकिस्तानचा नेट रनरेट हा -1.892 असा आहे. त्यामुळे हा सामना पावसामुळे रद्द झाल्यास आशिया कप 2023 फायनल टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यात होईल.
आशिया कपसाठी श्रीलंका क्रिकेट टीम | दासुन शनाका (कॅप्टन), कुसल मेंडिस (उपकर्णधार), पाथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल जेनिथ परेरा, चरिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, सदीरा समरविक्रमा, महेश थिक्षाना, दुनिथ वेललागे, मथीशा पाथिराना, कसून राजिथा, दुशन हेमंथा, बिनुरा फर्नांडो आणि प्रमोद मधुशन.
श्रीलंका विरुद्धच्या सामन्यासाठी पाकिस्तान प्लेईंग ईलेव्हन | बाबर आझम (कॅप्टन), मोहम्मद हरिस, इमाम उल हक, मोहम्मद रिजवान (विकेटकीपर), सऊद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम जूनियर, शाहीन शाह अफ्रीदी आणि जमान खान.