Asia Cup 2023 : आशिया कप संघात मोठा बदल, ‘या’ खेळाडूची संघात एन्ट्री

| Updated on: Aug 27, 2023 | 11:29 AM

तीन दिवस बाकी असताना संघात बदल का केला याची चर्चा क्रीडा वर्तुळात होत आहे. या खेळाडूच्या एन्ट्रीने मुख्य संघातील खेळाडूला राखीव म्हणून ठेवलं आहे.

Asia Cup 2023 : आशिया कप संघात मोठा बदल, या खेळाडूची संघात एन्ट्री
Follow us on

मुंबई : आशिया कप 2023 सुरू होण्यासाठी अवघे तीन दिवस बाकी आहेत. सर्व संघांनी जोरदार तयारी केली असून वनडे वर्ल्ड कपआधी ही मोठी स्पर्धा आहे. टीम इंडियाने आशिया कपमध्ये युवा खेळाडूंनाही संधी दिली आहे. अशातच एका राखीव खेळाडूला लॉटरी लागली असून त्याचा मुख्य संघाता समावेश केला गेला आहे. तीन दिवस बाकी असताना संघात हा बदल का केला याची चर्चा क्रीडा वर्तुळात होत आहे.

कोणत्या खेळाडूला संघात घेतलं?

हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून सौद शकील याचा आशिया कपमध्ये पाकिस्तान संघाने घेतलं आहे. शकील याला संघात घेतल्याने तय्यब ताहिर याला राखीव खेळाडू म्हणून ठेवण्यात आलं आहे. अफगाणिस्तानविरुद्ध सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेसाठी तो संघातील 18 वा खेळाडू होता.

आशिया कपमध्ये पाकिस्तानचा पहिला सामना 30 ऑगस्ट रोजी मुलतानमध्ये नेपाळविरुद्ध होणार आहे. सोमवारी संध्याकाळी बाबर आझम, इमाम-उल-हक आणि नसीम शाह यांच्यासोबत पाकिस्तानचा संघ 27 ऑगस्टला मुलतानला पोहोचेल.  पाकिस्तान आणि भारताचा हाय व्होल्टेज सामना 02 सप्टेंबरला होणार आहे.

दरम्यान, अफगाणिस्तानविरूद्धच्या वन डे मालिकेमधील शेवटच्या सामन्यामध्ये सौद शकील याचा प्लेइंग 11 मध्ये समावेश केला होता. मात्र त्याने अवघ्या 9 धावांवर आऊट झाला. अफगाणिस्तानविरूद्धची मालिका 3-0 ने पाकिस्तान संघाने जिंकली आहे.

आशिया कपसाठी संघ

पाकिस्तान संघ : बाबर आझम (कर्णधार), अब्दुल्ला शफीक, फखर जमान, इमाम-उल-हक, सलमान अली आगा, इफ्तिखार अहमद, मोहम्मद रिझवान, मोहम्मद हारिस, शादाब खान, मोहम्मद नवाज, उसामा मीर, फहीम अश्रफ, हरिस रौफ, मोहम्मद वसीम ज्युनियर, नसीम शाह, शाहीन आफ्रिदी, सौद शकील

राखीव खेळाडू: तय्यब ताहिर