मुंबई : भारत आणि पाकिस्तानमध्ये सूरू असलेल्या सामन्यामध्ये टीम इंडियाचे ओपनर रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी राडा केला आहे. पाकिस्तानच्या बॉलर्सचा घामटा काढलाय, रोहित शर्माने पहिल्या ओव्हरपासून मोठे फटके खेळायला सुरूवात केली. त्यानंतर युवा खेळाडू शुबमन गिल याच शो पाहायला मिळाला. पठ्ठ्याने पाकिस्तानचा स्ट्राईक बॉलर शाहिन शाह आफ्रिदीला पक्का फोडला. गिलने 10 चौकारांची आतषबाजी करत 37 चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं.
शुबमन गिल याने आपला स्वत: चा खेळ दाखवला, पहिल्या सामन्यात दडपण घेतल्याने आऊट झाला होता. मात्र नेपाळविरूद्ध अर्धशतक गिल फॉर्ममध्ये आला आणि पाकिस्तानविरूद्ध आपला क्लास दाखवला. शुबमनल गिल याने अवघ्या 37 चेंडूत 50 धावा करत आपल्या करियरमधील आठवं शतक पूर्ण केलं.
शुबमन गिल हा वन डे क्रिटकेटमध्ये 1000 धावांचा टप्पा सर्वात कमी धावात पूर्ण करणारा पहिला खेळाडू ठरला आहे. अवघ्या 19 डावांमध्ये गिलने ही कामगिरी केली आहे. त्यासोबतच 2023 मध्ये वनडे मध्ये सर्वाधिक करणारा भारतीय खेळाडू ठरला आहे. पाकिस्तानविरूद्ध दुसरा सामना खेळणाऱ्या गिलने सर्वांना त्याची ताकद दाखवून दिली आहे. रोहित शर्मा आऊट झाल्यावर गिलसुद्धा लगोलग आऊट झाला,
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (C), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, इशान किशन (W), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
पाकिस्तान (प्लेइंग इलेव्हन): फखर जमान, इमाम-उल-हक, बाबर आझम (C), मोहम्मद रिझवान (W), आगा सलमान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हॅरिस रॉफ