मुंबई : अशिया कप 2023 मधील दुसरा सामना श्रीलंका आणि बांगलादेश या दोन संघांमध्ये सुरू आहे. बांगलादेश संघाने प्रथम टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांची सुरुवात एकदम खराब झालेली आहे. दुसऱ्या ओव्हरमध्ये बांगलादेशला पहिला झटका बसला, महेश तीक्ष्णाने तन्झिद हसन याला शून्यावर माघारी पाठवलं. त्यानंतर आठव्या ओव्हरमध्ये बांगलादेशचा दुसरा गडी बाद झाला. मोहम्मद नईमला अवघ्या 16 धावांवर धनंजया डी सिल्वाने आऊट केलं.
दोन विकेट गेल्या होत्या त्यावेळी बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसन हा संघाचा डाव सावरणार असं वाटत होतं. मात्र श्रीलंकेचा बेबी मलिंग म्हणून ओळखला जाणारा महेश पथिराणाने त्याला आपल्या जाळ्यात अडकवलं. शाकिब 20 धावांवर माघारी परतला. या विकेटमागे कीपरची मेहनत महत्त्वाची ठरली. कुसल मेंडिस याने कमाल कॅच घेतला आणि धोकादायक शाकिबला आऊट केलं.
— No-No-Crix (@Hanji_CricDekho) August 31, 2023
दिलशान मदुशंका, लाहिरु कुमारा, वानिंदु हसरंगा आणि दुष्मंथा चमीरा हे मुख्य खेळाडू दुखापतीमुळे बाहेर आहेत. त्यामुळे श्रीलंका संघा पहिल्यापेक्षा काहीस कमकुवत आहे. श्रालंकेप्रमाणे बांगलादेश संघाचेही दोन मुख्य खेळाडू दुखापतीमुळे बाहेर पडले आहेत. बांगलादेशचा डाव 164 धावांवर आटोपला यामध्ये पाथिरानाने सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या.
श्रीलंका प्लेईंग इलेव्हन | दासुन शानाका (कॅप्टन), पाथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, दुनिथ वेललागे, महेश तीक्ष्णा, कसुन राजिथा आणि मथीशा पाथिराना.
बांगलादेश प्लेईंग इलेव्हन | शाकिब अल हसन (कर्णधार), मोहम्मद नईम, तन्झिद हसन, नजमुल हुसेन शांतो, तौहीद ह्रदॉय, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), मेहिदी हसन मिराझ, महेदी हसन, तस्किन अहमद, शरीफुल इस्लाम आणि मुस्तफिजुर रहमान.