मुंबई : आशिया कप 2023 चा दुसरा सामना श्रीलंका आणि बांगलादेश या दोन संघांमध्ये पार पडला. या सामन्यामध्ये श्रीलंका संघाने 5 विकेट्सने विजय मिळवला होता. दोन्ही संघांमध्ये अटीतटीचा सामने पाहायला मिळतात. श्रीलंका संघाने एकहाती सामना जिंकत स्पर्धेची सुरूवात केलीये. गतविजेत्या श्रीलंका संघाचे मुख्य खेळाडू दुखापीतमुळे आशिया कपला मुकले असले तरीसुद्धा संघाने झकास सुरूवात केली आहे. गुरूवारी झालेल्या सामन्यामध्ये वाद झालेला पाहायला मिळाला. नागीन डान्स सर्वांना माहित आहे, दोन्ही संघांमध्ये तेव्हापासून टसल पाहायला मिळते. कालच्या सामन्यात नेमकं काय झालं की दोन्ही संघाचे खेळाडू एकमेकांना भिडले.
पाहा व्हिडीओ-
— No-No-Crix (@Hanji_CricDekho) August 31, 2023
बांगलादेश संघाचा डाव प्रथम फलंदाजी करताना 164 धावांवर आटोपला. त्यानंतर श्रीलंकेचा संघ बॅटींग करत असताना चौथ्या ओव्हरमध्ये किस्सा झाला. बांगलादेश संघाचा वेगवान गोलंदाज शरीफुल इस्लाम आणि श्रीलंकेचा फलंदाज कुसल मेंडिस यांच्यात वाद झाला.
बांगलादेशचा गोलंदाजा शरीफुल इस्लाम याने बॉस टाकल्यावर कीपरला काहीतरी बोललेला. मात्र कुसल मेंडिसला वाटलं तो त्यालाच काहीतरी बोलला तेव्हा या गैरसमजातून दोघे आमने-सामने आले. दोघे एकमेकांना भिडणार तेवढ्यात पंचांनी मध्यस्थी करत वाद मिटवला. त्यावेळी बांगलादेशचे इतर खेळाडूही जमा झालेले. मात्र पंचांनी वाद जास्त वाढू न देता तिथेच मिटवला.
बांगलादेश प्लेईंग इलेव्हन | शाकिब अल हसन (कर्णधार), मोहम्मद नईम, तन्झिद हसन, नजमुल हुसेन शांतो, तौहीद ह्रदॉय, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), मेहिदी हसन मिराझ, महेदी हसन, तस्किन अहमद, शरीफुल इस्लाम आणि मुस्तफिजुर रहमान.
श्रीलंका प्लेईंग इलेव्हन | दासुन शानाका (कॅप्टन), पाथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, दुनिथ वेललागे, महेश थेक्षाना, कसुन राजिथा आणि मथीशा पाथिराना.