मुंबई : आशिया कप 2023 च्या सुपर 4 चा श्रीलंका आणि पाकिस्तानमधील पाचवा सामना रोमांचक ठरला, शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यामध्ये श्रीलंकेने बाजी मारली. श्रीलंका संघाचा हातून हा सामना पाकिस्तानने खेचूनच घेतला होता. मात्र शेवटच्या दोन चेंडूंवर संपूर्ण सामना फिरला. चुकून गेलेला चौकार आणि त्यानंतर चतुराईने दोन धावा काढत संघाला विजय मिळवून दिला. या विजयासह आशिया कपच्या 2023 च्या फायनलमध्ये सर्वाधिक वेळा प्रवेश करणारा पहिला संघ ठरला आहे.
पाकिस्तान संघावर विजय मिळवत श्रीलंकेने फायनलचं तिकिट काढलं. श्रीलंका संघ वन डे आणि टी-20 फॉरमॅटमधील आशिया कपमध्ये सर्वात जास्त वेळा एन्ट्री करणारा संघ ठरला आहे. श्रीलंकेपाठोपाठ भारताने आणि त्यानंतर पाकिस्तान संघाने सर्वाधिकवेळा फायनलमध्येस प्रवेश केला आहे. श्रीलंकेने 12 वेळा, भारत 10, पाकिस्तान 5 आणि बांगलादेश संघाने 3 वेळा अंतिम फेरी गाठली आहे.
श्रीलंका संघाने 2022 साली आशिया कप जिंकला होता, पाकिस्तान संघाचा अंतिम सामन्यात पराभव करत ट्रॉफीवर नाव कोरलं होतं. त्याआधी सेमी फायनलमध्ये भारतीय संघाचा पराभव करत त्यांनी सर्वांनाच धक्का दिला होता. भारताने सर्वाधिकवेळा आशिया कप जिंकला असला तरी फायनलमध्ये सर्वाधिकवेळा श्रीलंकेने बाजी मारली आहे.
पाकिस्तान संघाने प्रथम फलंदाजी करताना 252 धावा केल्या होत्या. स्टार खेळाडू मोहम्मद रिझवान याने नाबाद 86 आणि अब्दुल्लाह शफीक 52 धावा केल्या होत्या. दोघांच्या अर्धशतकांच्या जोरावर पाकिस्तान संघाने 250 चा टप्पा पार केलेला. फायनल गाठण्यासाठी पाकिस्तानने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या श्रीलंका संघाची खडतर झालेली. समरविक्रमा आणि कुसल मेंडिस यांनी मजबूत भागीदारी करत सामन्याचा संघाच्या पारड्यात झुकवला होता. पाकिस्ताने शेवटला मुसंडी मारलेली पण असलंका याने मैदानावर तळ ठोकला होता. त्यानेच मॅचविनिंग शॉट खेळला आणि संघाला विजय मिळवून दिला.