BAN vs SL : आशिया कपमध्ये सुपर 4 मधील बांगलादेशसमोर श्रीलंकेचं आव्हान, कोणाचं पारडं जड!

| Updated on: Sep 09, 2023 | 12:39 AM

Asia Cup 2023 BAN vs SL : बांगलादेशला शनिवारी होणाऱ्या सामन्यात विजय मिळवावाच लागणार आहे. हा सामना शनिवारी दुपारी तीन वाजता सुरू होणार आहे. दोन्ही संघांची आकडेवारी पाहिली तर पाहा कोणाचा पारडं जड आहे.

BAN vs SL : आशिया कपमध्ये सुपर 4 मधील बांगलादेशसमोर श्रीलंकेचं आव्हान, कोणाचं पारडं जड!
Follow us on

मुंबई : आशिया कप 2023च्या सुपर 4 फेरीमधील दुसरा सामना बांगलादेश आणि श्रीलंकामध्ये पार पडणार आहे. या सामन्यामध्ये बांगलादेश संघाला आपलं स्पर्धेतील आव्हान टिकवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागणार आहे. कारण पहिल्या सामन्यात पाकिस्तान संघाकडून पराभव झाला होता. त्यामुळे बांगलादेशला शनिवारी होणाऱ्या सामन्यात विजय मिळवावाच लागणार आहे. हा सामना शनिवारी दुपारी तीन वाजता सुरू होणार आहे. दोन्ही संघांची आकडेवारी पाहिली तर पाहा कोणाचं पारडं जड आहे.

श्रीलंका आणि बांगलादेश वन डे क्रिकेटमध्ये आतापर्यंत 52 सामने खेळले आहेत. यामधील 41 सामने श्रीलंका संघाने जिंकले असून त्यातील 9 सामन्यांमध्ये बांगलादेश संघाने विजय मिळवला आहे. त्यामुळे ही आकडेवारी पाहिली तर श्रीलंका संघाचं पारडं जड आहे. मात्र बांगलादेशच्या संघाला हलक्यात घेणं श्रीलंकेला परवडणार नाही त्यामुळे हा सामना अटीतटीचा होऊ शकतो.

यंदाच्या आशिया कपमध्ये बांगलादेश आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ एकमेकांसोबत भिडले होते. या सामन्यात बांगलादेश संघाचा श्रीलंकेने 5 विकेट्सने पराभव केला होता. त्यामुळे या सामन्यात बांगलादेश संघ पराभवाचा बदला घेण्यासाठी उत्सुक असणार आहे.

आशिया कपसाठी श्रीलंका क्रिकेट टीम | दासुन शनाका (कॅप्टन), कुसल मेंडिस (उपकर्णधार), पाथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल जेनिथ परेरा, चरिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, सदीरा समरविक्रमा, महेश थिक्षाना, दुनिथ वेललागे, मथीशा पाथिराना, कसून राजिथा, दुशन हेमंथा, बिनुरा फर्नांडो आणि प्रमोद मधुशन.

आशिया कप 2023 साठी बांगलादेश टीम | शाकिब अल हसन (कॅप्टन), लिटॉन दास, तंजीद हसन तमीम, नजमुल हुसैन शांतो, तॉहिद हृदॉय, मुशफीकुर रहीम, मेहंदी हसन मिराज, तस्कीन अहमद, मुस्तफिजुर रहमान, हसन महमूद, महेदी हसन, नसुम अहमद, शमीम हुसेन, अफीफ हुसेन, शरीफुल इस्लाम, एबादत हुसेन आणि मोहम्मद नईम.