कोलंबो | आशिया कप 2023 च्या सुपर 4 राउंडमध्ये टीम इंडियाने पाकिस्तान आणि श्रीलंकेला धुळ चारत आशिया कपच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया दुसऱ्यांदा आशिया कपचा फायनल सामना खेळणार आहे. वन-डे वर्ल्डकप आधी टीम इंडियाचे अनेक खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये दिसले आहेत. ही टीम इंडियासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. या तीन खेळाडूंच्या जबरदस्त कामगिरीमुळे टीम इंडियाने झालेल्या सर्व सामन्यात चांगले प्रदर्शन केलं आहे. नेमके कोण आहेत ते खेळाडू जाणून घ्या.
रोहित शर्मा : टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याने आता पर्यंतर झालेल्या आशिया कपच्या सामन्यांमध्ये आपल्या चांगली बॅटींग करत टीम इंडियाला चांगली सुरुवात करुन दिली आहे. आशिया कपच्या 4 सामन्यात त्याने 108 च्या स्ट्राइक रेटने 194 रन्स केले आहेत. आशिया कप 2023 च्या आता पर्यंतच्या सामन्यात रोहित शर्माने सर्वाधिक धावा केल्या आहेत.
चायनामन कुलदीप यादव : टीम इंडियाचा चायनामन फिरकी बॉलर कुलदीप यादव यानेही आशिया कप 2023 चांगली गोलंदाजी केली आहे. पाकिस्तानच्या बॅट्समनना तर त्याने त्याच्या फिरकीच्या तालावर नाचवलं. पाकड्यांना त्याला बॉलचं समजत नव्हता. परिणामी त्याने पाकिस्तान विरुद्ध 5 विकेट्स घेतल्या. तर श्रीलंका विरुद्धच्या निर्णायक सामन्यात त्याने 4 बळी घेतले आहेत.
हार्दिक पंड्या : टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर आणि उप कर्णधार हार्दिक पांड्या याने ही आशिया कप 2023 मध्ये आपल्या ऑलराउंडर खेळाने चांगली कामगिरी केली आहे. हार्दिक याने चार सामन्यातील 2 खेळींमध्ये 92 धावा केल्या आणि धावा रोखत 3 विकेट्स घेत चांगली गोलंदाजी केली आहे. हार्दिक पांड्या त्याच्यावर असलेल्या टीमच्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे झेलताना दिसतं आहे. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात ही त्याने प्रेशरमध्ये 87 धावांची चांगली खेळी केली होती.
दरम्यान, टीम इंडियाच्या या खेळाडूंसह इतर खेळाडूंनीही आपली कामगिरी चांगल्या प्रकारे बजावली आहे. आशिया कप 2023 मध्ये चांगले प्रदर्शन करुन टीम इंडियाने अंतिम सामन्यात प्रवेश मिळला आहे. आता अंतिम सामन्यात टीम इंडियासमोर कोण असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.