कोलंबो | आशिया कप 2023 सुपर 4 मधील तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तान विरुद्ध आक्रमक सुरुवात केली. टीम इंडियाच्या रोहित शर्मा आणि शुबमन गिल या सलामी जोडीने दे देणादण फटकेबाजी केली. या दरम्यान दोघांनी 121 रन्सची ओपनिंग पार्टनरशीप केली. या दरम्यान दोघांनी वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केली. रोहित-शुबमनच्या खेळीच्या जोरावर टीम इंडियाने 2 विकेट्स गमावून 147 धावांपर्यंत मजल मारता आली. मात्र त्यानंतर सामन्यात पावसाची एन्ट्री झाली. त्यामुळे मुख्य दिवसाचा सामना पावसामुळे वाया गेला. त्यामुळे आता राखीव दिवशी 11 सप्टेंबरला सामना होणार आहे.
आर प्रेमदासा स्टेडियममध्ये पावसामुळे खेळ थांबला तोवर टीम इंडियाने 24.1 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 147 धावा केल्या. आता राखीव दिवशी सामन्याला दुपारी 3 वाजता सुरुवात होणार आहे. विराट 8 आणि केएल 17 धावांवर नाबाद आहेत. आता पावसामुळे सामना राखीव दिवसात गेला. त्यामुळे टीम इंडियासमोर मोठं आव्हान आहे. टीम इंडियाला सलग 3 दिवस मैदानात खेळावं लागणार आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या खेळाडूंचा चांगलाच कस लागणार आहे.
पाक-भारत सामना मुख्य दिवशी पूर्ण न झाल्याने 11 सप्टेंबरला पार पडेल. त्यानंतर 12 सप्टेंबर रोजी टीम इंडिया सुपर 4 मध्ये श्रीलंका विरुद्ध खेळणार आहे. राखीव दिवसानंतर टीम इंडियाला 24 तासांच्या आतच श्रीलंका विरुद्ध खेळावं लागणार आहे. त्यामुळे टीम इंडियाला सलग 3 दिवस खेळावं लागणार आहे. त्यामुळे याचा टीम इंडियाच्या खेळाडूंच्या कामगिरीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
टीम इंडियाची टेन्शन वाढवणारी बातमी
India played on 10th September.
India will play on 11th September.
India will play on 12th September.
– It’ll be a big challenge for the Indian bowlers! pic.twitter.com/RlPQgQLkHP
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 10, 2023
पाकिस्तान विरुद्ध सुपर 4 मधील टीम इंडियाने आपल्या पहिल्या सामन्यात शानदार सुरुवात केली. रोहित शर्मा आणि शुबमन गिल या दोघांनी अर्धशतकं झळकावली. रोहितने 56 आणि शुबमनने 58 धावा केल्या. गिलने 52 बॉलमध्ये 10 फोर ठोकले. दोघांनी फक्त 100 बॉलमध्ये 121 धावांची भागीदारी केली.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
पाकिस्तान प्लेईंग ईलेव्हन | बाबर आझम (कॅप्टन), फखर जमान, इमाम-उल-हक, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), आगा सलमान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह आणि हरिस रउफ.