PAK vs SL : श्रीलंका आणि पाकिस्तान सामन्यात कोणते खेळाडू ठरणार बाजीगर? कसं असेल पिच? जाणून घ्या

| Updated on: Sep 13, 2023 | 4:29 PM

Asia Cup 2023, PAK vs SL : आशिया कप 2023 स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताने धडक मारली आहे. बांगलादेश विरुद्धचा सामना औपचारिक असणार आहे. तर पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात अंतिम फेरीसाठी करो या मरोची लढाई आहे.

PAK vs SL : श्रीलंका आणि पाकिस्तान सामन्यात कोणते खेळाडू ठरणार बाजीगर? कसं असेल पिच? जाणून घ्या
PAK vs SL : श्रीलंका पाकिस्तान सामन्यात हे अकरा खेळाडू उघडतील नशिबाचं दार, जाणून घ्या पिच रिपोर्ट इतर बाबी
Follow us on

मुंबई : आशिया कप इतिहासात भारतानंतर श्रीलंकेचा वरचष्मा पाहायला मिळाला आहे. भारताने सात, श्रीलंकेने सहा, तर पाकिस्तानने दोन वेळा जेतेपदावर नाव कोरलं आहे. आता भारताने दहाव्यांदा अंतिम फेरीत स्थान मिळवलं आहे. दुसरीकडे, अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात करो या मरोची लढाई असणार आहे. अंतिम फेरीत स्थान मिळवण्याची दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. पण या सामन्यात कोणते प्लेयर्स बाजी मारतील. तसेच कोणत्या खेळाडूंमध्ये सामना पालटण्याची धमक आहे? याबाबत जाणून घ्या. पिच रिपोर्ट, प्लेइंग इलेव्हनसह इतर बाबीही महत्त्वाच्या ठरतील.

गुणतालिकेत भारतीय संघ पहिल्या स्थानावर, श्रीलंका दुसऱ्या स्थानावर, पाकिस्तान तिसऱ्या आणि बांगलादेश चौथ्या स्थानावर आहे. त्यामुळे पाकिस्तान आणि श्रीलंकेला अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी सामना जिंकावाच लागणार आहे. पाकिस्तान श्रीलंका यांच्या आतापर्यंत 155 सामने झाले आहेत. यापैकी 92 सामन्यात पाकिस्तानने, तर 58 सामन्यात श्रीलंकेनं विजय मिळवला आहे. त्यामुळे या सामन्यात तसं पाकिस्तानचं पारडं जड मानलं जात आहे.

पिच रिपोर्ट

आर. प्रेमदासा स्टेडियम फलंदाजीसाठी उत्तम मानलं जातं. याच मैदानात दोन सामने झाले आहेत. पहिल्या सामन्यात 356 धावा झाल्या होत्या. तर दुसऱ्या सामन्यात 220 धावा करणंही कठीण झालं होतं. असं असलं तरी फलंदाजीसाठी योग्य आहे. वेगवान गोलंदाजांना दुसऱ्या टप्प्यात यश मिळेल. तर फिरकीपटूंना दहा षटकानंतर मदत मिळेल. या मैदानात 260 धावा होऊ शकतात. त्यामुळे नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीला प्राधान्य दिलं जाईल.

दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

पाकिस्तान : फखर झमान, इमाम उल हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), आघा सलमान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हारिस रउफ.

श्रीलंका :पाथुम निस्सांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल मेंडिस (विकेटकीपर) सदीरा समाराविक्रमा, चरिथ असालांका, धनंजय डिसिल्वा, दासुन शनाका (कर्णधार), दुनिथ वेल्लालगे, महीश थीक्षाणा, कसुन राजिथा,महीशा पथिराना

कोणते प्लेयर्स लकी ठरू शकतात?

बाबर आझम आणि शाहीन आफ्रिदी यांच्यापैकी एकाची कर्णधार म्हणून निवड करू शकता. दोघंही सध्या फॉर्मात असून करो या मरोच्या लढाईत चांगली कामगिरी करतील अशी अपेक्षा आहे. त्यानंतर सदीरा समाराविक्रमा, पाथुम निस्सांका हे खेळाडू महत्त्वाचे ठरतील. तर दासुन शनाका आणि नसीम शाह हे बजेट प्लेयर्स ठरतील. उपकर्णधार म्हणून इमाम उल हक किंवा सदीरा समाराविक्रमा हे चांगले ठरू शकतात.

लकी इलेव्हन 1 : बाबर आझम (कर्णधार), कुसल मेंडिस (विकेटकीपर), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), इमाम उल हक, सदीरा समाराविक्रमा, पाथुम निस्सांका, शादाब खान, धनंजय डिसिल्वा, शाहीन आफ्रिदी (उपकर्णधार), महीश थीक्षाणा, हारीस रौफ.

लकी इलेव्हन 2 : शाहीन आफ्रिदी (कर्णधार), इमाम उल हक (उपकर्णधार), कुसल मेंडिस (विकेटकीपर), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), सदीरा समाराविक्रमा, पाथुम निस्सांका, बाबर आझम, शादाब खान, धनंजय डिसिल्वा, महीश थीक्षाणा, मथीशा पथिराना.