Asia Cup 2023 मध्ये पाकिस्तानकडून श्रीलंकेविरूद्ध ‘मलिंगा’ मैदानात, फायनलसाठी ब्रम्हास्त्र बाहेर!

| Updated on: Sep 14, 2023 | 8:52 AM

आशिया कपच्या फायनलसाठी दुसरा संघ कोण हे आजच्या सामन्यातून समजणार आहे. पाकिस्तान आणि श्रीलंका दोन्ही संघ फायनलच्या तिकिटासाठी आमनेसामने येणार आहेत. बाबर आझमने एक चाल केली असून पाकिस्तानच्या मलिंगाला श्रींलेकविरूद्धच्या सामन्यात संधी दिली आहे.

Asia Cup 2023 मध्ये पाकिस्तानकडून श्रीलंकेविरूद्ध मलिंगा मैदानात, फायनलसाठी ब्रम्हास्त्र बाहेर!
श्रीलंकेचा लसिथ मलिंगा हा आयपीएलमध्ये फक्त मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या काही खेळाडूंपैकी एक आहे. 2009 ते 2021 पर्यंत एकूण 139 सामने खेळलेल्या मलिंगाने 195 बळी घेतले आहेत. यात मुंबईने पाचवेळे जेतेपद मिळवलं आहे.
Follow us on

मुंबई : आशिया कप 2023 मध्ये पाकिस्तान श्रीलंका आणि पाकिस्तान आमनेसामने येणार आहेत. हा सामना दोन्ही संघासाठी महत्त्वाचा आहे. जो संघ जिंकेल तो थेट फायनलमध्ये धडक मारणार आहे. पाकिस्तानने आजच्या सामन्याच्यासाठी प्लेइंग 11 चा घोषणा केली असून यामध्ये एका स्पेशल खेळाडूचा समावेश केला आहे. या खेळाडूला पाकिस्तानचा मलिंगा असंही म्हटलं जातं, त्यामुळे आजच्या सामन्यामध्ये श्रीलंकेविरूद्ध पाकिस्तान मलिंगाला मैदानात उतरवणार आहे.

कोण आहे पाकिस्तानता ‘मलिंगा’?

पाकिस्तान संघाचा मलिंगा म्हणजे दुसरा तिसरा कोणी नाही तर जमान खान आहे. नसीम शाह दुखापतीमुळे बाहेर पडल्याने त्याच्या जागी जमान खान याचा संघात समावेश केला गेलाय. पाकिस्तानने आपल्या संघात जवळपास पाच बदल केले आहेत. हॅरिस रॉफ आणि नसीम शाह दुखापतीमुळे बाहेर झाले आहेत.

पाकिस्तानचा मलिंगा म्हणजेच जमान खान 22 वर्षीय गोलंदाज आहे. आतापर्यंत जमान याने 6 टी-20 सामने खेळले आहेत. पाकिस्तान सुपर लीगमध्ये जमान याने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. 22 वर्षीय जमानने PSL मध्ये 68 सामन्यांमध्ये 86 विकेट्स घेतल्या आहेत.

पाकिस्तान संघाच्या मागे दुखपतीच ग्रहण लागलं आहे. मुख्य गोलंदाज आशिया कपमधून बाहेर झाले आहेत. आगामी वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानसाठी ही वाईट बातमी असून मुख्य गोलंदाज नाही फिट झाले तर संघाच्या अडचणीत वाढ झाली आहे. जर आजच्या सामन्यामध्ये पावसाने हजेरी लावली तर सर्वात जास्त नुकसान हे पाकिस्तान संघाचं  होणार आहे. दोन्ही संघांना एक-एक गुण मिळाला तर कमी रनरनेटमुळे पाकिस्तान आशिया कपसाठी पात्र ठरू शकत नाही.

पाकिस्तान संघाचा भारताने 231 धावांनी पराभव करत आशिया कपच्या फायनल सामन्यासाठी एक पाऊल टाकलं होतं. त्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये पाकिस्तानचा पराभव करत फायनलमध्ये एन्ट्री केली होती.

श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यासाठी पाकिस्तानचा संघ :-

मोहम्मद हरिस, इमाम उल हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, सौद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, शाहीन आफ्रिदी, मोहम्मद वसीम जूनियर, जमान खान.