अफगाणिस्तानचा भारताला दे धक्का! आशिया कप 2024 स्पर्धेत केलं 20 धावांनी पराभूत

| Updated on: Oct 25, 2024 | 10:45 PM

एसीसी मेन्स टी20 इमर्जिंग टीम्स आशिया कप 2024 स्पर्धेंत भारताचं आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आलं आहे. अफगाणिस्तानने 20 षटकात 4 गडी गमवून 206 धावा केल्या आणि विजयासाठी 207 धावांचं आव्हान दिलं. पण भारताला ही धावसंख्या काही गाठता आली नाही.

अफगाणिस्तानचा भारताला दे धक्का! आशिया कप 2024 स्पर्धेत केलं 20 धावांनी पराभूत
Image Credit source: Twitter
Follow us on

अफगाणिस्तानने भारताला विजयरथ उपांत्य फेरीत रोखत अंतिम फेरीत धडक मारली आहे. अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांच्यात आता अंतिम फेरीसाठी लढत होणार आहे. अफगाणिस्तानने पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठली आहे. उपांत्य फेरीत भारताविरूद्धच्या सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय सर्वस्वी योग्य ठरला. कारण अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांची पिसं काढली. पहिल्या गड्याासाठी 137 धावांची भागीदारी केली. तसेच 20 षटकात 4 गडी गमवून 206 धावा केल्या आणि विजयासाठी 207 धावांचं आव्हान दिलं. भारतीय गोलंदाजांना अफगाणिस्तानचे विकेट घेणं झटपट काही जमलं नाही. शेवटच्या षटकात काही तीन विकेट काढल्या. तिथपर्यंत अफगाणिस्तानचं काम झालं होतं. हे आव्हान गाठताना टीम इंडियाची सुरुवात निराशाजनक राहिली. अभिषेक शर्मा 7 धावा करून तंबूत परतला. त्यानंतर प्रभसिमरन सिंग आणि कर्णधार तिलक वर्माही काही खास करू शकले नाहीत. त्यानंतर आलेल्या आयुष बदोनीने त्यातल्या त्यात चांगली खेळी केली. पण धावगती वाढवण्यास अपयशी ठरला.

नेहल वढेराने 20 धावा केल्या आणि तंबूत परतला. पण त्यानंतर रमणदीप सिंगने मोर्चा सांभाळला. एक क्षण असं वाटत होतं की हा सामना काढेल. पण धावा आणि चेंडूमधील अंतर वाढत गेलं आणि विजय कठीण झाला. रमणदीप सिंगची झुंजार अर्धशतकी खेळी यामुळे वाया गेली. खरं तर आघाडीच्या फलंदाजांनी साजेशी कामगिरी केली नाही. त्यामुळे मधल्या फळीत दडपण आलं. भारताला 20 षटकात 7 गडी गमवून 186 धावा करता आल्या. भारताला विजयासाठी 20 धावा कमी पडल्या. भारताकडून रमणदीप सिंगने सर्वोत्तम खेळी केली. त्याने 34 चेंडूत 8 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 64 धावा केल्या.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

इंडिया अ (प्लेइंग इलेव्हन) : प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा (कर्णधार), आयुष बडोनी, नेहल वढेरा, रमणदीप सिंग, निशांत सिंधू, अंशुल कंबोज, राहुल चहर, रसिक दार सलाम, आकिब खान.

अफगाणिस्तान अ (प्लेइंग इलेव्हन): सेदीकुल्ला अटल, झुबैद अकबरी, दरविश रसूली (कर्णधार), मोहम्मद इशाक (विकेटकीपर), करीम जनात, शाहिदुल्ला कमाल, शराफुद्दीन अश्रफ, अब्दुल रहमान, अल्लाह गझनफर, कैस अहमद, बिलाल सामी