आशिया कप 2024 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत अफगाणिस्तानने भारतीय गोलंदाजांची पिसं काढली असं म्हणायला हरकत नाही. अफगाणिस्तानने पहिल्या विकेटसाठी 137 धावांची भागीदारी केली. झुबैद अकबारी आणि सेदिकुल्लाह अटल याने जबरदस्त खेळी केली. त्यामुळे अफगाणिस्तानला मोठी धावसंख्या उभारण्यास मदत झाली. दरम्यान झुबैद अकबारी 41 चेंडूत 5 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 64 धावा करून बाद झाला. त्यानंतर सेदिकुल्लाह अटल याने वादळी खेळी सुरुच ठेवली. 204 च्या स्ट्राईक रेटने 83 धावा केल्या. याता त्याने 7 चौकार आणि 4 षटकार मारले. त्यामुळे अफगाणिस्तानची धावसंख्या 180 पार गेली होती. अफगाणिस्तानच्या खेळीमुळे भारताचं टेन्शन वाढत होतं. दरम्यान, रसिख सलामने सलग दोन विकेट अफगाणिस्तानला रोखण्याचा प्रयत्न केला. पण या दोन्ही विकेट 18व्या षटकात आल्या. त्यामुळे अफगाणिस्तानचं काम तिथपर्यंत झालं होतं. करीम जनतने त्यानंतर मोर्चा सांभाळला. 20 चेंडूत तुफान फटकेबाजी करत 41 धावा केल्या. भारतीय गोलंदाज फक्त हतबल दिसत होते. अफगाणिस्तानने 10.3 च्या रनरेटने धावा केल्या आहेत. त्यामुळे भारताला विकेट सांभाळून बोर्डवर धावा लावाव्या लागणार आहेत.
भारताकडून रसिख दार सलामने 3, तर अकिब खानने एक विकेट घेतली. दरम्यान अफगाणिस्तानने 20 षटकात 4 गडी गमवून 206 धावा केल्या आहेत. तसेच विजयासाठी 207 धावांचं आव्हान दिलं आहे. त्यामुळे भारतीय संघ अफगाणिस्तानने दिलेलं आव्हान गाठणार का? असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला. दरम्यान, श्रीलंकेने पाकिस्तानला पराभूत करत अंतिम फेरी गाठली आहे. पाकिस्तानने श्रीलंकेसमोर 136 धावांचं आव्हान दिलं होतं . हे आव्हान 16.3 षटकात श्रीलंकेने पूर्ण केलं.
इंडिया अ (प्लेइंग इलेव्हन) : प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा (कर्णधार), आयुष बडोनी, नेहल वढेरा, रमणदीप सिंग, निशांत सिंधू, अंशुल कंबोज, राहुल चहर, रसिक दार सलाम, आकिब खान.
अफगाणिस्तान अ (प्लेइंग इलेव्हन): सेदीकुल्ला अटल, झुबैद अकबरी, दरविश रसूली (कर्णधार), मोहम्मद इशाक (विकेटकीपर), करीम जनात, शाहिदुल्ला कमाल, शराफुद्दीन अश्रफ, अब्दुल रहमान, अल्लाह गझनफर, कैस अहमद, बिलाल सामी