मुंबई : टीम इंडियाचा सामना उद्या म्हणजेच रविवारी पाकिस्तान संघासोबत सामना पार पडणार आहे. सुपर-4 मधील टीम इंडियाचा पहिला सामना पाकिस्तानसोबत असणार आहे. या सामन्याआधी संघातील आणखी एक खेळाडू स्वदेशी परतला आहे. आता मागे जसप्रीत बुमराह अचानक घरी गेला होता. त्याला पुत्ररत्न प्राप्त झालं होतं त्यानंतर तो परत एकदा संघासोबत जोडला गेला आहे. मात्र आता बुमराहनंतर कोणता खेळाडू माघारी परतला आहे.
हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून टीम इंडियाचा स्टार खेळाडू संजू सॅमसन आहे. संजू सॅमसन भारतात परतल्याची माहिती समजत आहे. संजूल आशिया कपमध्ये राखीव कीपर म्हणून सोबत ठेवलं होतं. मात्र के. एल. राहुल माघारी परतल्याने त्याला घरचा रस्ता धरावा लागला आहे. राहुल फिट झाल्यावर टीम मॅनेजमेंटने संजू सॅमसन याला माघारी पाठवण्याचा निर्णय घेतलाय.
आशिया कप स्क्वॉड जाहीर झाल्यावर संजू सॅमसन याला संघात राखीव कीपर म्हणून संघात स्थान दिलं होतं. टीम इंडियाचा के.एल. राहुल दुखापती असल्याने ईशान किशन याला पर्यायी कीपर म्हणून संजूला सोबत घेतलं होतं. मात्र के. एल. राहुल फिट झाल्यावर त्याला आता मायदेशी परतावं लागलं आहे.
टीम इंडियाचा पाकिस्ताविरूद्धचा सामना रविवारी होणार आहे. आशिया कपचा इंडिया-पाकिस्तानमधील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. रविवारी होणाऱ्या सामन्यावरही पावसाचं संकट असणार आहे. मात्र या सामन्यासाठी एक राखीव दिवस ठेवण्यात आला आहे.
आशिया कपसाठी भारताचा संघ : रोहित शर्मा (C), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, इशान किशन, हार्दिक पांड्या (VC), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराज, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव आणि प्रसिध कृष्णा