मुंबई : आशिया कप 2023 मधील तिसऱ्या सामन्यावर सर्वांची नजर असणार आहे. महामुकाबला भारत-पाकमध्ये होणार आहे. दोन्ही संघ जवळपास 4 वर्षांनी आमने-सामने आले आहेत. आजच्या मुकाबल्यासाठी दोन्ही संघाच्या शिलेदारांनी चांगली तयारी केली आहे. मात्र सामन्यामध्ये मोठं संकट आलं आहे. हवामान खात्याने आधीच अंदाज वर्तवला होता की, आजच्या सामन्यात 70 ते 80 टक्के पाऊस येणार आहे. हे आस्मानी संकट असताना आणखी एका संकटाची भर पडली आहे.
पावसामुळे सामन्यामध्ये व्यत्यय येणार असल्याचं सांगितलं पण आता वातावरण आता वातावरण आणखी खराब होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. पावसाससह विजांचा कडडाटही होणार असल्याची माहिती आता समोर आली आहे. दुपारच्या सुमारास 55 टक्के पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
भारत -पाक सामन्यामध्ये पावसाने हजेरी लावली आणि शेवटी सामना रद्द करावा लागला दोन्ही संघांन एक एक गुण दिला जावू शकतो. याआधी दोन्ही संघ वन डे क्रिकेचमध्ये तब्बल चार वर्षांनी एकमेकांना भिडणार आहेत. वर्ल्ड कपच्या सामन्यामध्ये रोहित शर्मा याने शतक झळकवलं होतं.
भारत आणि पाकिस्तान आतापर्यंत 132 वन डे सामने खेळले गेले आहेत. यामधील पाकिस्तानने 73 आणि भारताने 55 जिंकले आहेत, राहिलेले चार सामने अनिर्णित राहिले आहेत.
आजच्या सामन्यासाठी पाकिस्तान संघ | बाबर आजम (कॅप्टन), शादाब खान (उप कर्णधार), फखर जमान, इमाम उल हक, मोहम्मद रिजवान, इफ्तिखार अहमद, सलमान अगहा, मोहम्मद नवाझ, शाहीन अफ्रीदी, नसीम शाह आणि हॅरिस रऊफ.
भारत संपूर्ण स्क्वॉड: रोहित शर्मा (कॅप्टन), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (VC), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराज, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा, संजू सॅमसन