मुंबई : भारताने श्रीलंका संघाचा आशिया कप 2023 च्या फायनलमध्ये दहा विकेट्सने पराभव केला. मोहम्मद सिराज याने 6 विकेट घेत श्रीलंका संघाला खिंडार पाडलं होतं. ही फायनल म्हणजे श्रीलंका संघासाठी एखाद्या वाईट स्वप्नाप्रमाणे असेल. भारताने या विजयसासह भारतीय संघाने आठव्यांदा आशिया कपच्या ट्रॉफीवर नाव कोरलं आहं. इतकंच नाहीतर सर्वाधिकवेळी आशिया कप जिंकण्याच्या यादीमध्ये भारत अग्रस्थानी आहे. या सामन्यामध्ये एक खेळाडू असा होता जो फक्त फायनसाठी 13000 KM प्रवास करत आला होता. मात्र गडी फक्त प्लेइंग 11 मध्ये असून फक्त प्रेक्षकासारखा होता.
बांगलंदेशविरूद्धच्या सामन्यामध्ये भारताचा पराभव झाला होता, या सामन्यात अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल याच्या हाताल दुखापत झालेली. अक्षरच्या जागी ज्या एका खेळाडूला रिप्लेस करण्यात आलं तो भारतात होता. फायनल सामना श्रीलंकेच्या कोलंबोमधील प्रेमदासा स्टेडिअममध्ये होता. फायनल सामन्यासाठी बुलावा आल्याने गडी खूश झालेला.
रातोरात फोन आल्यावर श्रीलंकेच्या दिशेने निघाला, बंगळुरूच्या फिटनेस सेंटरमधून त्याने थेट श्रीलंकेसाठी उड्डाण भरलं. कोलंबोमध्ये आला अन् फायनल सामन्यासाठी मैदानात उतरला पण ना त्याने बॉलिंग केली ना बॅटिंग केली. सगळं सोडा त्याने एक कॅचसुद्धा घेतला नाही. ग्रुप स्टेज आणि सुपर 4 मधील एकही सामना न खेळता फायनलमध्ये निवड झाल्यावर कोणतीही कामगिरी न करता विजेतेपद जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून वॉशिग्टन सुंदर आहे.
दरम्यान, भारताने फायनल सामन्यामध्ये श्रीलंका संघाला अवघ्या 50 धावांवर गुंडाळलं होतं. मोहम्मद सिराज याने सुरूंग लावत लंकेला बॅकफूटला ढकललं होतं. गड्याने अवघ्य 15 बॉलमध्ये 5 विकेट्स घेतल्या होत्या. मोहम्मद सिराज 6, हार्दिक पंड्या 3 तर जसप्रीत बुमराहने 1 विकेट घेतली होती. 51 धावांचा पाठलाग करताना भारताकडून ईशान किशन आणि शुबमन गिल ओपनिंगला उतरले होते.