Asia Cup 2023 मध्ये पहिल्यांदाच होऊ शकतो असा करिष्मा, 39 वर्षांच्या इतिहासात कधीच झालं नाही!

| Updated on: Sep 14, 2023 | 8:26 PM

Asia Cup 2023 : 984 पासून ही स्पर्धा चालू झाली आहे. त्यावेळी भारताच्या कर्णधारपदी सुनील गावसकर होते, आता रोहित शर्मा भारताचा कर्णधार आहे. आशिया कपला 39 वर्षे झाली असून आतापर्यंत अनेक विक्रम रचले गेले होते. मात्र या 39 वर्षात एक अशी गोष्ट आहे जी आतापर्यंत झाली नाही.

Asia Cup 2023 मध्ये पहिल्यांदाच होऊ शकतो असा करिष्मा, 39 वर्षांच्या इतिहासात कधीच झालं नाही!
Follow us on

मुंबई : आशिय कप 2023 च्या फायनलमध्ये भारताने एन्ट्री केली आहे. आता पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील सामन्याच्या निकालानंतर दुसरा संघ कोणता ते समोर येणार आहे. आशिया कपचा इतिहास पाहिला तर 1984 पासून ही स्पर्धा चालू झाली आहे. त्यावेळी भारताच्या कर्णधारपदी सुनील गावसकर होते, आता रोहित शर्मा भारताचा कर्णधार आहे. आशिया कपला 39 वर्षे झाली असून आतापर्यंत अनेक विक्रम रचले गेले होते. मात्र या 39 वर्षात एक अशी गोष्ट आहे जी आतापर्यंत झाली नाही.

कोणती आहे ती गोष्ट?

आतापर्यंत आशिया कपवर भारताने सर्वाधिकवेळा नाव कोरलं आहे. मात्र 39 वर्षात भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ फायनलमध्ये आतापर्यंत कधीच आमने-सामने आले आहेत. प्रत्येकवेळी आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान दोन वेळा आमने सामने आले आहेत. मात्र कधीच भारत-पाकमध्ये फायनल सामना झाला नाही. यंदाच्या वर्षी 39 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच भारत आणि पाकिस्तान आमने-सामने येण्याची शक्यता आहे.

भारत आणि पाकिस्तान या दोन संघांमध्ये फायनल होण्याची शक्यता आहे. फक्त त्यासाठी पाकिस्तान संघाला श्रीलंका संघावर विजय मिळवावा  लागणार आहे. आज्च्या सामन्यात पावसाने खोळंबा घातला तर यंदाही  भारत पाक फायनलमध्ये आमने सामने येणार नाहीत. कारण पावसाने हा सामना रद्द झाला तर पाकिस्तान आणि श्रीलंका संघांना एक-एक गुण मिळणार आहे. याचा तोटा पाकिस्तानला संघाला होणार आहे. कारण पाकिस्तानचा भारताने मोठा पराभव केला होता त्यामुळे पाकिस्तानचा रन रेट मायनस झाला आहे. एक गुणाने श्रीलंकेचा संघ फायनलमध्ये जागा मिळवणार आहे.

दरम्यान, आशिया कप 2023 मध्ये पाकिस्तान, भारत, नेपाळ आणि अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश संघांनी जागा मिळवली होती. यामध्ये आता भारताने फायनलमध्ये जागा मिळवली आहे. आता पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यामधील विजयी संघ भारतासोबत फायनलमध्ये लढतील.