दुबई : सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav), ज्याला स्काय म्हणून ओळखलं जातं, त्याने आपल्या बॅटिंगचा सुरेख नजराणा हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात दाखवला. अखेरच्या ओव्हरमध्ये सूर्याने शानदार चार सिक्स मारले. त्यातील पहिले तीन सिक्स हे पहिल्या तीन बॉलवरच आले होते. त्यामुळे युवराजने (Yuvraj Singh 6 Sixes against Sixes) जी कमाल इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात करुन दाखवली होती, तीच पुन्हा पाहायला मिळते की काय, असं चाहत्यांना दोन मिनिटं वाटून गेलं. पण चौथा बॉल ओव्हरचा डॉट केला आणि ती संधी हुकली. पण पाचव्या बॉलवर सूर्यकुमार यादवने पुन्हा एकदा सिक्स (Suryakumar Yadav Sixes) मारला. शेवटच्या ओव्हरच्या पहिल्या पाच बॉल्समध्येच त्याने 30 धावा कुटल्या होत्या. त्यामुळे गोलंदाजावर वेगळाच दबाव आला असता, तर आश्चर्य वाटायला नको. तसा तो आलाही होता. पण 20व्या ओव्हरचा शेवट करताना बोलंदाजाने कमबॅक केलं. सिक्स किंवा फोर जाणार नाही, याची काळजी घेतली. शेवटच्या बॉलवर सिक्स फोर गेला नसला, तरी आपल्या रनिंग बिटवीन द विकेट्सने दोन धावा फटाफट पूर्ण केल्या होत्या.
50 moment of Surya ? it was no doubt The Surya Show ??#INDvHK #AsiaCup2022 #SuryakumarYadav pic.twitter.com/EiGYQ0Jywx
हे सुद्धा वाचा— Abhishek Asopa (@AbhishekAsopa87) August 31, 2022
सूर्यकुमार यादवने 68 धावांची खेळी केली. अवघ्या 26 धावांमध्ये सूर्यकुमार यादवने तब्बल 251.54च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केली. यात 6 फोर आणि तितकेच सिक्सही मारले. या 6 सिक्स पैकी चार सिक्स तर एका ओव्हरमध्ये मारले होते. के एल राहुलच्या विकेटनंतर सूर्यकुमार यादव बॅटिंगसाठी उतरला होता. त्याने शेवटपर्यंत टिकून राहत भारताला एका अवाढव्य धावसंख्येपर्यंत पोहोचवलं.
India plunder 54 runs in the last three overs with Suryakumar Yadav completing a 22-ball fifty ?#INDvHK | #AsiaCup2022 | ? Scorecard: https://t.co/4PnOYdeR6H pic.twitter.com/H0WyIrOxuq
— ICC (@ICC) August 31, 2022
??????? ?????: A sparkling 98-run partnership from 42 balls between @imVkohli and @surya_14kumar takes India to 192-2 against Hong Kong. The two batters smashed 78 runs in the last 5 overs. ??⚡️
Details: https://t.co/k9H9a0e758 #INDvHK #AsiaCup2022 pic.twitter.com/vro0mMnuLc
— BCCI (@BCCI) August 31, 2022
Even the king Kohli should bow ? for him?? #SuryaKumar Yadav ? pic.twitter.com/OfbpEq2VPk
— सम्राट अशोक ➐ (@BoltaBharat2) August 31, 2022
विराट कोहलीच्या साधीने शानदार भागीदारी रचन सूर्यकुमारने भारताचा स्कोअर 190च्या पार नेला. विराट कोहलीनेही अर्धशतकी पारी खेळत दमदार फलंदाजी केली. 192 धावा भारताने अवघ्या 2 विकेट गमावून केल्या होत्या. त्याआधी सूर्यकुमारने 36 आणि रोहित शर्माने 21 धावा केल्या होत्या. आशिया कपमध्ये भारताने पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध खेळला होता. त्यानंतर दुसरा सामना हाँगकाँग विरुद्ध खेळताना सूर्यकुमार यादवने आपला फॉर्म कायम ठेवलाय. तर विराट कोहलीचंही जुनं रुप चाहत्यांना पुन्हा एकदा अनुभवता आलंय.