मुंबई : आशिया कप 2023 मधील भारत पाकिस्तानचा सामना सुरू असून टीम इंडिया बॅकफूटला ढकलली गेली आहे. टीम इंडियाचे स्टार खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा परत एकदा स्वस्तात बाद झाले. पद्धतशीरपणे पाकिस्तानचा स्ट्राईक गोलंदाज शाहिन आफ्रिदीने दोघांनाही ट्रॅप लावत आऊट केलं. आशिया कपच्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाचे मुख्य खेळाडू अशा प्रकारे नांगी टाकली. रोहित आणि विराटने 140 कोटी जनतेचा हिरमोड केला. शाहिन आफ्रिदीने आपलं काम चोखपणे करत संघाला चांगली सुरूवात करून देत एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.
शाहिन आफ्रिदीने एकाच वन डे सामन्यामध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांना केलं. एकाच वन डे सामन्यामध्ये दोघांचीही विकेट घेणारा तो पहिलाच खेळाडू ठरला आहे. रोहित शर्मा याने 22 बॉलमध्ये 11 धावा केल्या यामध्ये त्याने दोन चौकार मारले. तर कोहलीने 7 चेंडूत अवघ्या 4 धावा केल्या. कोहलीने चौकार मारत सुरूवात केली होती. मात्र त्याला मोठी खेळी करण्यात अपयश आलं. शाहिन आफ्रिदीने दोघांना आऊट करत टीम इंडियाला धक्यावर धक्के दिले.
श्रेयस अय्यर आल्यावर डावाची सूत्रे आपल्या हातात घेत त्याने दोन चौकार मारले. अय्यर डाव सावरणार असं वाटलं होतं मात्र मोठा फटका मारण्याच्या नादात तो कॅच आऊट झाला. शुबमन गिलसुद्धा सावध खेळला आणि बोल्ड आऊट झाला. आता मैदानात इशान किशन आणि हार्दिक पंड्याने जम बसवल्यासारखं दिसत आहे. इशान किशन अर्धशतक करून नाबाद आहे आणि त्याला हार्दिक पंड्याही साथ देत आहे.
पाकिस्तान संघ (प्लेइंग इलेव्हन) | बाबर आजम (कॅप्टन), शादाब खान (उप कर्णधार), फखर जमान, इमाम उल हक, मोहम्मद रिजवान, इफ्तिखार अहमद, सलमान अगहा, मोहम्मद नवाझ, शाहीन अफ्रीदी, नसीम शाह आणि हॅरिस रॉफ.
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल, इशान किशन विराट कोहली, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या (उप कर्णधार),, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज