Asian Games 2023 | टीम इंडियासमोर सेमी फायनलमध्ये या संघाचं आव्हान, सामना केव्हा?

| Updated on: Oct 04, 2023 | 5:14 PM

Asian Games 1st Semi Final Indian Cricket Team | ऋतुराज गायकवाड याच्या नेतृत्वात टीम इंडियाने नेपाळला चितपट करत उपांत्य फेरीत धडक दिली. आता टीम इंडिया फायनलमध्ये पोहचण्यापासून फक्त 1 पाऊल दूर आहे. टीम इंडियाचा सेमी फायनलमध्ये कुणाविरुद्ध सामना होणार?

Asian Games 2023 | टीम इंडियासमोर सेमी फायनलमध्ये या संघाचं आव्हान, सामना केव्हा?
Follow us on

बिजिंग | एशियन गेम्स 2023 स्पर्धेत मेन्स क्रिकेट टीम इंडिया सेमी फायनलमध्ये पोहचली आहे. टीम इंडियाने 3 ऑक्टोबरला पहिल्या क्वार्टर फायनलमध्ये नेपाळ क्रिकेट टीमवर 23 धावांनी विजय मिळवला. टीम इंडियाने यशस्वी जयस्वाल याचं शतक आणि रिंकू सिहं याच्या 37 धावांच्या नाबाद खेळीच्या जोरावर नेपाळला 20 ओव्हरमध्ये 203 धावांचं आव्हान दिलं. मात्र टीम इंडियाच्या भेदक माऱ्यासमोर नेपाळला 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 179 धावाच करता आल्या. टीम इंडियाने या विजयासह ऋतुराज गायकवाड याच्या नेतृत्वात सेमी फायनलमध्ये प्रवेश केला. आता टीम इंडियाचा सेमी फायनलमध्ये कोणाचं आव्हान असणार आहे ते निश्चित झालं आहे.

बांगलादेश विरुद्ध मलेशिया यांच्यात क्वार्टर फायनलमधील चौथा सामना पार पडला. बांगलादेशने या अटीतटीच्या सामन्यात मलेशियावर 2 धावांनी विजय मिळवला. बांगलादेशने मलेशियाला विजयासाठी 117 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र मलेशियाला 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 114 धावाच करता आल्या. मलेशियाचे प्रयत्न अवघ्या 2 धावांनी कमी पडले. त्यामुळे बांगलादेशचं सेमी फायनलमधील तिकीट कन्फर्म झालं.

आता एशियन गेम्समधील पहिल्या सेमी फायनलमध्ये टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश आमनेसामने असणार आहेत. हा सामना 6 ऑक्टोबर रोजी खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार सकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. हा सामना जिंकून टीम इंडियाचं अंतिम सामन्यात पोहचण्याचं स्वप्न असणार आहे. आता टीम इंडिया ऋतुराजच्या नेतृत्वात कशी कामगिरी करते, याकडे क्रिकेट चाहत्यांची करडी नजर असणार आहे.

एशियन गेम्स 2023 साठी बांगलादेश क्रिकेट टीम | सैफ हसन (कॅप्टन), जाकेर अली (विकेटकीपर), परवेझ हुसैन इमॉन, झाकीर हसन, महमुदुल हसन जॉय, अफिफ हुसैन, रिशाद हुसेन, शहादत हुसेन, सुमन खान, रकीबुल हसन, रिपन मंडोल, यासिर अली, मोसाद्देक हुसेन, तन्वीर इस्लाम, मृत्युंजय चौधरी आणि तनझिम हसन साकिब.

टीम इंडिया | ऋतुराज गायकवाड (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, राहुल त्रिपाठी, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, आवेश खान, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, आकाश दीप, शिवम दुबे आणि प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर)