Asian Games, Cricket : फायनलमध्ये भारत विरुद्ध अफगाणिस्तान, उपांत्य फेरीत पाकिस्तानचा 4 गडी राखून पराभव

| Updated on: Oct 06, 2023 | 3:03 PM

Asian Games, PAK vs AFG : एशियन गेम्सच्या उपांत्य फेरीत अफगाणिस्तानने पाकिस्तानला पराभूत केल आहे. आता अंतिम फेरीत भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात लढत होणार आहे. सुवर्ण आणि रौप्य पदकासाठी ही लढत असणार आहे.

Asian Games, Cricket : फायनलमध्ये भारत विरुद्ध अफगाणिस्तान, उपांत्य फेरीत पाकिस्तानचा 4 गडी राखून पराभव
Asian Games, Cricket : एशियन गेम्सच्या अंतिम फेरीत भारत विरुद्ध अफगाणिस्तान, पाकिस्तानचा उपांत्य फेरीत खेळ खल्लास!
Image Credit source: Twitter
Follow us on

मुंबई : वर्ल्डकप स्पर्धा सुरु असताना दुसरीकडे एशियन्स गेम्समध्ये क्रिकेटची रणधुमाळी सुरु आहे. एशियन गेम्समध्ये शुक्रवारी उपांत्य फेरीचे सामने पार पडले. भारताने बांगलादेशला 9 गडी राखून अंतिम फेरीत प्रवेश केला. तर अफगाणिस्तानने पाकिस्तानचा 4 गडी राखून पराभव केला. यामुळे अंतिम फेरीत भारत विरुद्ध अफगाणिस्तान अशी लढत होणार आहे. सुवर्ण पदकासाठी दोन्ही संघ आमनेसामने असणार आहेत. पराभूत झालेल्या संघाला रौप्य पदकावर समाधान मानावं लागेल. तर कांस्य पदसाठी बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यात लढत होणार आहे. अफगाणिस्तानने नाणेफेकीचा कौल जिंकत पाकिस्तानला फलंदाजीचं आमंत्रण दिलं. पण पाकिस्तानचा संघ मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरला.

पाकिस्तानचा डाव

पाकिस्तानचा संघ फक्त 18 षटकं खेळत सर्वबाद झाला. पाकिस्तानकडून ओमेर युसुर याने सर्वाधिक 24 धावा केल्या. तर अफगाणिस्तानकडून फरीद अहमद याने 3, कैस अहमद याने 2 तर जहीर खान याने 2 गडी बाद केले. गुलबदीन इब आणि करिम जनत याने प्रत्येकी एक गडी बाद केला. पाकिस्तानकडून एकाही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.

अफगाणिस्तानचा डाव

पाकिस्तानने दिलेल्या विजयी धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानची सुरुवात अडखळत झाली. सेदीकुल्लाह अटल अवघ्या 5 धावा करून तंबूत परतला. त्यानंतर मोहम्मद शहजादही काही खास करू शकला नाही. शहिदुल्लाह आला तसा तंबूत परतला. पण एका बाजून नूर अलीने किल्ला सांभाळला होता. अफसर झझाईची थोडी साथ मिळाली. पण ही जोडीही जास्त काळ टिकू शकली नाही. तर गुलबदीन नइब आणि शराफुद्दीन अश्रफ या जोडीने अफगाणिस्तानला विजय मिळवून दिलं.

दोन्ही संघांचे खेळाडू

पाकिस्तानचा संघ : ओमेर युसुफ, मिर्झा ताहीर बैग, रोहैल नझीर (विकेटकीपर), हैदर अली, कसिम अक्रम (कर्णधार), खुशदिल शाह, असिफ अली, आराफत मिन्हास, आमेर जमाल, उस्मान कादिर, सुफियन मुकीम.

अफगाणिस्तानचा संघ : सेदिदुल्लाह अटल, मोहम्मद शहजाद, नूर अली, शहिदुल्लाह, अफसर झझाई, करिम जनत, गुलबदीन नईब, शाराफुद्दीन अश्रफ, फरीद अहमद, झहीर खान, कैस अहमद.