होंगझोऊ | वूमन्स टीमनंतर आता मेन्स क्रिकेट टीम इंडियाने एशियन गेम्समध्ये धमाका केला आहे. पुणेकर ऋतुराज गायकवाड याच्या नेतृत्वात टीम इंडियाने एशियन गेम्स क्रिकेट स्पर्धेत अफगाणिस्तान विरुद्ध सुवर्ण पदक पटकावलं आहे. या सामन्यात अफगाणिस्तानच्या बॅटिंगदरम्यान पावसाने खोडा घातला. त्यामुळे बराच वेळ खेळ थांबला. पाऊस थांबण्याची बरीच वेळ प्रतिक्षा करण्यात आली. मात्र पाऊस काही थांबला नाही. त्यामुळे अखेर टीम इंडियाला रँकिंगच्या जोरावर टीम इंडियाला विजेता घोषित करण्यात आलं. तर अफगाणिस्तानला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं.
टीम इंडियाने टॉस जिंकला. अफगाणिस्तानला बॅटिंगसाठी भाग पाडलं. टीम इंडियाच्या भेदक माऱ्यासमोर अफगाणिस्तानची टॉप ऑर्डर फ्लॉप ठरली. झुबेद अकबरी 5, मोहम्मद शहझाद 4 आणि नूर अली झद्रान 1 धावेवर आऊट झाला. त्यानंतर अफसर झझाई 15 आणि करीम जनात 1 रन करुन आऊट झाले. त्यामुळे अफगाणिस्तानची 10.5 ओव्हरमध्ये 5 बाद 52 अशी स्थिती झाली. टीम इंडियाकडून अर्शदीप सिंह, शिवम दुबे, शहबाझ अहमद आणि रवी बिश्नोई या चौकडीने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
त्यानंतर शाहिदुल्ला कमाल आणि कॅप्टन गुलबदिन नायब या दोघांनी अफगाणिस्तानचा डाव सावरला. या दोघांनी 18.2 ओव्हरपर्यंत नाबाद 60 धावांची भागीदारी केली. शाहिदुल्ला कमाल 49 आणि कॅप्टन गुलबदिन नायब नाबाद 27 धावांवर खेळत होते. मात्र या दरम्यान पावसाने हजेरी लावली. खेळ थांबवण्यात आला. दोन्ही संघांचे खेळाडू मैदानाबाहेर गेले. पाऊस थांबण्याची अखेरपर्यंत वाट पाहण्यात आली. मात्र तो काही थांबला नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांनी टीम इंडियाला गोल्ड मेडल देण्याचा निर्णय घेतला.
टीम इंडियाला गोल्ड
Well done #TeamIndia! 🇮🇳
The @Ruutu1331-led side clinch a Gold 🥇 Medal at the Asian Games! 👏👏#IndiaAtAG22 | #AsianGames pic.twitter.com/UUcKNzrk0N
— BCCI (@BCCI) October 7, 2023
अफगाणिस्तान प्लेईंग ईलेव्हन | गुलबदिन नायब (कॅप्टन), झुबैद अकबरी, मोहम्मद शहजाद (विकेटकीपर), नूर अली जद्रान, शाहिदुल्ला कमाल, अफसर झझाई, करीम जनात, शराफुद्दीन अश्रफ, कैस अहमद, फरीद अहमद मलिक आणि झहीर खान
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन – ऋतुराज गायकवाड (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबे, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, रविश्रीनिवासन साई किशोर आणि अर्शदीप सिंग.