मुंबई : चीनमध्ये होणाऱ्या 19 एशियन गेम्स स्पर्धेसाठी बीसीसीाआयने महिला संघाची घोषणा केली आहे. सप्टेंबर महिन्यात ही स्पर्धा होणार असून महिला संघाचं कर्णधार हरमनप्रीत कौरकडेच संघाचं कर्णधारपद असून स्मृती मानधनाकडे उपकर्णधापद असणार आहे. चीनमधील होंगझाऊ येथे ही स्पर्धा पार पडली जाणार आहे. बीसीसीआयने महिला आणि पुरूष दोन्ही संघ पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. यामधील महिला संघामध्ये सर्व मुख्य खेळाडू असणार आहेत तर पुरूष संघामध्ये ए- टीम पाठवण्याचा निर्णय घेतलाय.
आशियाई क्रीड स्पर्धाेमध्ये क्रिकेट खेळाचा तिसऱ्यांदा समावेश करण्यात आला आहे. 2010, 2014 आणि 2022 साली क्रिकेट खेळ घेतला गेलेला. मात्र त्यावेळी बीसीसीयने फक्त महिला संघाला या स्पर्धेमध्ये प्रवेश करून दिला होता. 2022 साली इंग्लंडमध्ये खेळल्या गेलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत महिला क्रिकेट संघाने रौप्यपदकाची कमाई केली होती.
टीम इंडियाचा महिला क्रिकेट संघ बांगलादेश दौऱ्यावर आहे. आता झालेल्या टी-20 मालिकेमध्ये 2-1 ने पराभव केला होता. ही मालिका भारताने गमावली असती मात्र दुसऱ्या सामन्यात शेवटच्या ओव्हरमध्ये शफाली वर्माने 3 विकेट विजयावर शिक्कामोर्तब केलं होतं. तिसऱ्या सामन्यात बाांगलादेशने सहजरित्या टीम इंडियाचा पराभव करत व्हाईटवॉश टाळला.
हरमनप्रीत कौर (C), स्मृती मानधना, शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, ऋचा घोष (W), अमनजोत कौर, देविका वैद्य, अंजली सरवानी, तीतस साधू, राजेश्वरी गायकवाड, मिनू मणी, कनिका आहुजा, उमा छेत्री, अनिल छेत्री .
राखीव खेळाडू -: हरलीन देओल, काशवी गौतम, स्नेह राणा, सायका इशाक, पूजा वस्त्राकर
TEAM – Harmanpreet Kaur (C), Smriti Mandhana (VC), Shafali Verma, Jemimah Rodrigues, Deepti Sharma, Richa Ghosh (wk), Amanjot Kaur, Devika Vaidya, Anjali Sarvani, Titas Sadhu, Rajeshwari Gayakwad, Minnu Mani, Kanika Ahuja, Uma Chetry (wk), Anusha Bareddy https://t.co/kJs9TQKZfw
— BCCI Women (@BCCIWomen) July 14, 2023
टीम इंडिया | ऋतुराज गायकवाड (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, राहुल त्रिपाठी, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, आवेश खान, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, शिवम मावी, शिवम दुबे आणि प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर)
राखीव खेळाडू -: यश ठाकूर, साई किशोर, व्यंकटेश अय्यर, दीपक हुडा आणि साई सुदर्शन.