होंगझोऊ | चीनमधील होंगझोऊ इथे गेल्या अनेक दिवसांपासून एशियन गेम्स स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत टीम इंडियाने आतापर्यंत 60 पेक्षा अधिक पदकांची लयलूट केली आहे. तर सांघिक पातळीवर महिला क्रिकेट टीम इंडियाने अंतिम सामन्यात श्रीलंकेला चितपट करत सुवर्ण पदकाची कमाई केली. हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात वूमन्स टीम इंडियाने इतिहास रचला. आता त्यानंतर मेन्स टीम इंडिया ऋतुराज गायकवाड याच्या कॅप्टन्सीत एशियन गेम्स स्पर्धेतील आपला पहिलावहिला सामना खेळणार आहे.
टीम इंडियाने या स्पर्धेत आयसीसी क्रमवारीच्या जोरावर थेट क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे टीम इंडिया थेट क्वार्टर फायनल सामना खेळणार आहे. या सामन्यात टीम इंडियासमोर नेपाळ क्रिकेट टीमचं आव्हान असणार आहे. टीम इंडिया विरुद्ध नेपाळ हा सामना कधी होणार, कुठे होणार, मोबाईल आणि टीव्हीवर कुठे पाहता येणार, हे आपण जाणून घेऊयात.
टीम इंडिया विरुद्ध नेपाळ सामना हा मंगळवारी 3 ऑक्टोबर रोजी होणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध नेपाळ सामना कुठे?
टीम इंडिया विरुद्ध नेपाळ यांच्यातील सामना हा होंगझोऊमधील पिंगफेंग कॅम्पसमधील क्रिकेट ग्राउंडमध्ये खेळवण्यात येणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध नेपाळ सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
टीम इंडिया विरुद्ध नेपाळ या सामन्याला भारतीय वेळेनुसार सकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध नेपाळ सामना टीव्हीवर कुठे पाहता येणार?
टीम इंडिया विरुद्ध नेपाळ यांच्यातील सामना हा टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्क पाहता येईल.
टीम इंडिया विरुद्ध नेपाळ सामना मोबाईलवर कुठे पाहता येणार?
टीम इंडिया विरुद्ध नेपाळ यांच्यातील सामना हा मोबाईलवर सोनी लीव एपवर पाहता येईल.
दरम्यान टीम इंडिया विरुद्ध नेपाळ हे दोन्ही संघ दुसऱ्यांदा आमनेसामने येणार आहेत. याआधी दोन्ही संघ पहिल्यांदा आशिया कप 2023 स्पर्धेत एकमेकांसमोर आले होते. तेव्हा टीम इंडियाने नेपाळवर डकवर्थ लुईस नियमानुसार 10 विकेट्सने जिंकला होता.
एशियन गेम्स 2023 साठी टीम इंडिया | ऋतुराज गायकवाड (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, राहुल त्रिपाठी, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, आवेश खान, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, आकाश दीप, शिवम दुबे आणि प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर)
एशियन गेम्स 2023 साठी नेपाळ क्रिकेट टीम | रोहित पौडेल (कॅप्टन), कुशल भुर्तेल, संदीप जोरा, बिबेक यादव, दीपेंद्र सिंह आयरी, कौशल मल्ला, प्रतीस जीसी, ललित राजबंसी, आसिफ शेख, बिनोद भंडारी, करण के सी, सोमपाल कांपी, अबिनाश भोहरा, गुलशन झा आणि संदीप लामिछाने.