बिजिंग | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेला गुरुवार 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. मात्र क्रिकेट विश्वाला 14 ऑक्टोबरची प्रतिक्षा आहे. कारण 14 ऑक्टोबरला 2 कट्टर प्रतिस्पर्धी भिडणार आहेत. टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात 14 ऑक्टोबरला अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हा महामुकाबला होणार आहे. या सामन्यासाठी क्रिकेट चाहते उत्सुक आहेत. मात्र त्याआधी टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात हायव्होल्टेज क्रिकेट सामना होण्याची शक्यता आहे. दोन्ही कट्टर चिर प्रतिद्वंदी एशियन गेम्स 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात येण्याची शक्यता आहे.
एशियन गेम्स स्पर्धेत टीम इंडियासह एकूण 4 संघांनी थेट आयसीसी रँकिंगच्या जोरावर क्वार्टर फायनलचं तिकीट मिळवलं. टीम इंडियाचा क्वार्टर फायनलमध्ये नेपाळ विरुद्ध सामना झाला. टीम इंडियाने नेपाळवर 23 धावांनी मात केली. टीम इंडियाने यशस्वी जयस्वाल याच्या शतकाच्या जोरावर नेपाळसमोर 203 धावांचं लक्ष्य ठेवलं. मात्र नेपाळला 20 ओव्हरमध्ये 179 धावाच करता आल्या. टीम इंडियाने या विजयासह 3 ऑक्टोबर रोजी सेमी फायनलमध्ये प्रवेश केला.
तर दुसऱ्या बाजूला त्याच दिवशी दुसऱ्या क्वार्टर फायनलमध्ये हाँगकाँगवर 68 धावांनी विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. तर 4 ऑक्टोबर रोजी अफगाणिस्तानने श्रीलंकेवर विजय मिळवला. तर बांगलादेशने मलेशियावर मात करत सेमी फायनलचं तिकीट मिळवलं. अफगाणिस्तानने 8 धावांनी विजय मिळवला. तर बांगलादेशने मलेशियावर 2 धावांनी मात केली. अशाप्रकारे सेमी फायनलनमधील 4 संघ निश्चित झालेत.
आता पहिल्या सेमी फायनलमध्ये टीम इंडियासमोर बांगलादेशचं आव्हान असणार आहे. तर दुसऱ्या सामन्यात पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान असा सामना रंगणार आहे. त्यामुळे टीम इंडिया आणि पाकिस्तान या दोन्ही संघांनी उपांत्य फेरीत विजय मिळवला, तर क्रिकेट चाहत्यांना महाअंतिम सामना पाहायला मिळेल.
हे दोन्ही सेमी फायनलमधील सामने 6 ऑक्टोबर रोजी होणार आहेत. टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश सामन्याला सकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर त्यानंतर पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका सामना पार पडेल. तर अंतिम सामना 7 ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. त्यामुळे आता 6 ऑक्टोबरला होणाऱ्या उंपात्य फेरीतील सामन्यानंतरच टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान अंतिम सामना होणार की नाही, हे स्पष्ट होईल.
टीम इंडिया | ऋतुराज गायकवाड (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, राहुल त्रिपाठी, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर) आवेश खान, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, आकाश दीप आणि शिवम दुबे.