मुंबई : एशियन गेम्स 2023 स्पर्धेला मोठ्या दिमाखात सुरुवात झाली आहे. भारतीय महिला क्रिकेट एशियन गेम्समध्ये डेब्यू करणार आहे. यापूर्वी भारतीय महिला क्रिकेट संघने 2022 कॉमनवेल्थ गेम्समध्ये सहभाग घेतला होता. तेव्हा टीम इंडियाला रजत पदकावर समाधान मानावं लागलं होतं. एशियन गेम्समध्ये सुवर्ण पदाचा दावेदार आहे. चीनच्या हांगडूमध्ये भारतीय महिला संघ गुरुवारी मलेशियासोबत उपांत्यपूर्व फेरीचा सामना खेळणार आहे. या सामन्यात जिंकणारा संघ उपांत्य फेरीत धडक मारणार आहे. हरमनप्रीत कौर हीने बांगलादेश दौऱ्यात गैरवर्तन केल्याने तिच्या दोन सामन्यांची बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे हरमनप्रीत या सामन्यात नसेल. भारत आणि मलेशिया यांच्या 21 सप्टेंबरला हांग्जोतील झेजियांग युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नोलॉजी पिंगफेंग क्रिकेट मैदानात खेळला जाईल.
एशियन गेम्स 2023 मध्ये भारत विरुद्ध मलेशिया संघात भारतीय वेळेनुसार सकाळी 6.30 वाजता सामना सुरु होणार आहे. सोनी स्पोर्ट्स नेटवर्ककडे एशियन गेम्स 2023 च्या प्रसारणाचे अधिकार आहेत. भारत विरुध्द मलेशिया सामना सोनी स्पोर्ट्स1 (इंग्रजी), सोनी स्पोर्ट्स 2 (हिंदी) आणि सोनी स्पोर्ट्स 4 (तमिळ) वर पाहता येईल. तसेच सोनीलिव अॅपव आणि वेबसाईटवर हा सामना पाहता येईल.
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, रिचा घोष (विकेटकीपर), अमनजोत कौर, देविका वैद्य, तितास साधू, राजेश्वरी गायकवाड, मिन्नू मनी, कनिका आहुजा, उमा चेत्री (विकेटकीपर), अनुषा बरेड्डी, पूजा वस्त्राकर.
खेळाडू स्टँडबाय : हरलीन देओल, कशवी गौतम, स्नेह राणा, सायका इशाक.