बिजिंग | चीनमधील होंगझोऊ येथे एशियन गेम्स स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात अंतिम सामना होणार आहे. टीम इंडियाने सेमी फायनलमध्ये बांगलादेशवर 9 विकेट्सने विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. तर दुसऱ्या बाजूला अफगाणिस्तानने पाकिस्तानला चारीमुंड्या चित करत फायनलमध्ये धडक मारली. अशाप्रकारे दोन्ही संघांनी फायनलमध्ये तिकीट मिळववलं. आता दोन्ही संघ गोल्ड मेडलसाठी आमनेसामने भिडणार आहेत. हा सामना कधी होणार, किती वाजता सुरुवात होणार, मोबाईल आणि टीव्हीवर कुठे पाहता येणार, हे आपण जाणून घेऊयात.
टीम इंडिया-अफगाणिस्तान यांच्यातील अंतिम सामना हा शनिवारी 7 सप्टेंबर रोजी खेळवण्यात येणार आहे.
टीम इंडिया-अफगाणिस्तान अंतिम सामना पिंगफिंग कॅम्पस क्रिकेट कॅम्पस होंगझोऊ इथे आयोजित करण्यात आला आहे.
टीम इंडिया-अफगाणिस्तान अंतिम सामन्याला भारतीय वेळेनुसार सकाळी 11 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 11 वाजता टॉस होईल.
टीम इंडिया-अफगाणिस्तान अंतिम सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल.
टीम इंडिया-अफगाणिस्तान अंतिम सामना मोबाईलवर सोनी लिव्ह एपवर पाहता येईल. तसेच सामन्यातील महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला टीव्ही9 मराठी या वेबसाईटवरुन जाणून घेता येतील.
अफगाणिस्तान क्रिकेट टीम | गुलबदीन नायब (कॅप्टन), सेदीकुल्ला अटल, मोहम्मद शहजाद (विकेटकीपर), नूर अली झद्रान, शाहिदुल्ला कमाल, शराफुद्दीन अश्रफ, अफसर झझाई, करीम जनात, कैस अहमद, फरीद अहमद मलिक, झहीर खान, सय्यद शिरजाद, निजात मसूद, झुबैद अकबरी आणि वफीउल्ला तारखिल.
एशियन गेम्ससाठी टीम इंडिया | ऋतुराज गायकवाड (कर्णधार), यशस्वी जयसवाल, राहुल त्रिपाठी, तिलक वर्मा, रिंकू सिंह, जितेश शर्मा (विकेटकीपर), वाशिंगटन सुंदर, शाहबाज अहमद, रवि बिश्नोई, आवेश खान, अर्शदीप सिंह, मुकेश कुमार, प्रभसिमरन सिंह (विकेटकीपर), शिवम दुबे आणि आकाश दीप.